
आलिया भट्ट सध्या तिच्या सिनेमांसोबतच तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे.

एक फोटो शेअर करत आलियाने ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तेव्हापासून आलिया आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

आई होणार असली तरी आलिया सध्या तिच्या सिनेमांच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. या प्रमोशन इव्हेंटमध्ये सध्या आलियाचे वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत.

आतापर्यंत पार पडलेल्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किंवा फोटोशूटमध्ये आलियाने खास लूक केल्याचं पाहायला मिळालं. या खास कपड्यांमधून आलिया तिचं बेबी बंप लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय. तिने कायम काहीसे सैल कपडे निवडले.

मात्र पहिल्यांदाचा आलियाने बिनधास्तपणे तिचं बेबी बंप फ्लॉन्ट केलं आहे.

. ‘डार्लिंग्ज’ सिनेमानंतर आलिया आणि रणबीर आता त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या एका प्रमोशन इव्हेंटला आलियाचा खास लूक पाहायला मिळाला.

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात आलियाने एक ब्राऊन रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. यात ड्रेसमध्ये आलियाचं बेबी बंप स्पष्टपणे दिसतं आहे.

याच ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

“प्रेससोबत देवा देवा पाहण्यासाठी सर्व सज्ज आहोत आणि माझा चिमुकला डार्लिंगही” असं खास कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या फोटोंना मोठी पसंती मिळताना दिसते.

प्रेग्नेसीनंतर आलियाने काही फोटोशूट केले होते. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोडही केले आहेत.

काही भारतीय तर काही वेस्टर्न लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या सर्वच कपड्यांमध्ये आलियाने तिचं बेबी बंप लपविण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.

गरोदर असल्याची बातमी दिल्यानंतर पहिल्यांदाच आलियाला या पिवळ्या ड्रेसमध्ये मीडियाने स्पॉट केलं होतं.

गरोदर असल्यामुळे आलियाचं सौदर्य अधिकच खुललं असल्याचं तिचे चाहते म्हणत आहेत.