-
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्हीही मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघीही दिसायला सुंदर आहे.
-
त्या दोघीही बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये फार प्रसिद्ध आहे.
-
जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघीही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.
-
जान्हवीने २०१८ मध्ये धडक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
तिला तिच्या अभिनयावरुन अनेकदा ट्रोल केले जाते. ती श्रीदेवी यांच्यासारखा अभिनय कधी करु शकत नाही, अशा कमेंट करत नेटकरी तिला ट्रोल करताना दिसतात.
-
नुकतंच जान्हवीने या सर्व ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.
-
“माझी आई मला म्हणाली होती की, तू सिनेसृष्टीत येऊ नकोस. माझ्या मुलांना भविष्यात आरामदायी जीवन जगता यावे, यासाठी मी आयुष्यभर काम केले. चित्रपटसृष्टीतील आयुष्य कधीच आरामदायी नसते”, असे सल्ला तिने मला दिला होता.
-
“पण त्यावेळी मी तिला सांगितले होते की मला चित्रपट आवडतात. त्यामुळे मला त्यातच करिअर करायचे आहे.”
-
“त्यावर मला आईने जर तुला अभिनयाची इतकी आवड असेल तरच तू त्यात करिअर कर, असे सांगितले होते.”
-
त्यापुढे जान्हवी म्हणाली, “माझी आई मला नेहमी सांगायची की तू खूप भोळी आणि निरागस मनाची आहेस.”
-
“तू खूप पटकन एखाद्या गोष्टीमध्ये अडकतेस. तुला त्रासही फार लवकर होतो आणि जर तुला सिनेसृष्टीत टिकायचे असेल तर तुला खंबीर व्हावे लागेल.”
-
“तू तसे व्हावेस अशी माझी अजिबात इच्छा नाही. तुला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागावा, असेही मला वाटत नाही.”
-
“तुझ्या पहिल्या चित्रपटाची तुलना लोक माझ्या ३०० चित्रपटांशी करतील, त्याला तू कशाप्रकारे सामोरे जाशील? असेही त्यावेळी मला आईने विचारले होते.”
-
“मला माहिती होते की माझ्यासाठी हे सर्व फार कठीण असणार आहे. पण त्यासोबत हेही माहिती होते की मी जर अभिनय केला नाही तर आयुष्यभर दु:खी राहिन.”
-
“मला तिची आजही फार आठवण येते”, असेही ती म्हणाली.
-
‘श्रीदेवी यांची मुलगी असल्यामुळे तुझ्यावर जास्त टीका होते, असे तुला खरंच वाटतं का?’ हा प्रश्न विचारला असता जान्हवी कपूरने होकारार्थी मान डोलवली.
-
“हो अगदीच. लोक माझ्या पहिल्या चार चित्रपटांची तुलना त्यांच्या ३०० चित्रपटांशी करत आहेत.”
-
“पण मला यांसह इतर कशाचीही माहिती नाही. मला फक्त त्यांच्यासाठी यात करिअर करायचे आहे.”
-
“त्यांचे नाव कायमच स्मरणात राहावे. त्यांच्या नावाला मी असेच सोडू शकत नाही”, असेही जान्हवीने म्हटले.
-
जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट २९ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१८ मधील तमिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा हिंदी रिमेक होता.
-
त्यानंतर आता जान्हवी ‘मिली’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या तीन चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…