-
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि अभिनेता नील भट्ट यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे.
-
नीलने लग्नातील खास फोटो शेअर करत ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या.
-
ऐश्वर्यानेही नीलला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
ऐश्वर्या आणि नीलने गुजराती पद्धतीने लग्न केलं होतं.
-
त्यांचा विवाहसोहळा खूप साध्या पद्धतीने पार पडला होता.
-
नील आणि ऐश्वर्याने लव्ह मॅरेज केलं होतं.
-
दोघांचं लग्न झालं तेव्हा ते ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते.
-
मालिकेचं शुटिंग करतानाच दोघेही प्रेमात पडले होते.
-
“मला एखाद्या अभिनेत्यासारखं नाही, तर सामान्य माणसासारखं लग्न करायचं होतं. कारण माझा लग्नावर विश्वास आहे,” असं नील म्हणाला होता.
-
करोना काळात मी आणि ऐश्वर्याने बराच वेळ एकत्र घालवला, त्यामुळे लग्नानंतर आयुष्यात फार बदल झाला नाही, असंही नीलने सांगितलं होतं.
-
ऐश्वर्या बऱ्याचदा नीलच्या घरी राहायची, त्यामुळे तिचं कुटुंबींयाशी छान बाँडिगं झालं होतं, असं नील म्हणाला होता.
-
अभिनेता असल्यामुळे मी माझ्या लग्नाची बातमी लपवावी, असं मला कधीच वाटलं नाही, असंही नील म्हणाला.
-
‘गुम है किसी के प्यार मे’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
-
ही मालिका टीआरपीमध्ये टॉपवर असून ऐश्वर्या आणि नीलला प्रेक्षक खूप पसंत करतात.
-
(फोटो – नील भट्टच्या फेसबुकवरून साभार)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”