-
ऑन स्क्रीन राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
सोशल मीडियावर यांच्याच लग्नाची चर्चा आहे.
-
या दोघांच्याही घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
-
दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने ते त्यांच्या अकाऊंटवरून आणि मित्र मैत्रिणींच्या अकाऊंटच्या माध्यमातून फोटोज शेयर करत आहेत.
-
नुकतंच अक्षयाच्या ग्रहमुख सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यांनंतर तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले.
-
आता अक्षया पाठोपाठ हार्दिकच्या हळदीचे फोटो अमोल नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
हळद भावाची असं म्हणत अमोल यांनी ही फोटो शेअर केले आहेत.
-
हार्दिकची हळद अगदी थाटामाटात साजरी झाली.
-
त्याच्या जवळच्या लोकांनी येऊन फार धमाल केली. सेलिब्रेशन म्हणून हार्दिकला सगळ्यांनी केकदेखील भरवला.
-
अमोल नाईक यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या मित्राची भूमिका साकारली होती.
-
चाहत्यांना आता हार्दिक व अक्षयाच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमोल नाईक/ इन्स्टाग्राम)

“तुम्हाला हे शोभत नाही” म्हणत अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी केलेलं ट्रोल; त्याच फोटोंवर जॅकी श्रॉफ कमेंट करत म्हणाले…