-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वाद अद्यापही शमलेला नाही. पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली असल्याने राजकीय नेत्यांसह काही धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे.
-
त्यातच अयोध्येमधील संत परमहंस आचार्य यांनी धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी शाहरुखला जिवंत जाळून टाकण्याची जाहीर धमकीच दिली आहे. तसंच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं आहे.
-
“पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. आमच्या सनातन धर्मातील लोक सतत याचा विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचं पोस्टर जाळलं आहे.”
-
“आता मी त्याला शोधत आहे. जर मला तो कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकू. जर इतर कोणी जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. या चित्रपटावर बहिष्कार टाका असं मी आवाहन करतो”, असं परमहंस आचार्य म्हणाले आहेत.
-
मात्र एखाद्या कलाकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली ही पहिलीच वेळ नाही. याधीही मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना अशा धमक्या मिळाल्या आहेत. आज आपण या कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत.
-
शाहरुख खानच्या आधी अभिनेता आमीर खानलाही ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाच्या वेळेस जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
-
यानंतर आमीर खानने आपल्या सुरक्षेसाठी जवळपास १० कोटी खर्चही केले होते.
-
२०२२ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘द काश्मीर फाइल्स’ या वादग्रस्त चित्रपटासाठी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
-
‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ ही ऐतिहासिक चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणला जीवे मारण्यासाठी धमकी देण्यात आली होती.
-
सामुहिक बलात्कारची बळी ठरलेली राजस्थानमधील ३६ वर्षीय नर्स भंवरी देवीची २०११ साली जोधपूरच्या बिलारा परिसरातून बेपत्ता झाल्यानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची उकल झाली असता राज्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला होता.
-
याच घटनेवर आधारित चित्रपटात ‘भवंरी देवी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मल्लिका शेरावतला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००० साली अंडरवर्ल्डच्या लोकांनी अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांच्यावर हल्ला करत दोन गोळ्या झाडल्या होत्या.
-
‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या नफ्यातील वाटा देण्यासाठी अंडरवर्ल्डकडून त्यांना धमकी मिळाली होती. त्यावेळी राकेश रोशन यांनी त्यांना नकार दिला होता.
-
‘आरआरआर’ चित्रपटात आलिया भट्टला कास्ट केल्याबद्दल एसएस राजामौली यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
-
‘रक्त चरित्र’ या चित्रपटासाठी राम गोपाल वर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. (Photos: Instagram)

सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे राजकारण झालं…”