-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने अलीकडेच ठाण्यापासून काही अंतरावर तिच्या स्वप्नातील सुंदर घर खरेदी केलं.
-
अभिनेत्रीने घरातील प्रत्येक कोपरा आकर्षकरित्या सजवला आहे.
-
ऋतुजाने तिच्या नव्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिच्या घरातून दिसणारा सुंदर व्ह्यू, हटके नेमप्लेट, भिंतीवर कोरलेलं विठ्ठलाचं नाव याचबरोबर आणखी एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अभिनेत्रीच्या नव्या घरात एका बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो लावण्यात आला आहे.
-
शाहरुख-सलमान नव्हे तर ऋतुजा बागवे रणबीर कपूरची खूप मोठी चाहती आहे.
-
ऋतुजा सांगते, “रणबीर कपूर मला प्रचंड आवडतो. तो माझा आवडता अभिनेता आहे. सकाळी उठल्यावर त्याचा फोटो समोर दिसावा असं नेहमी वाटायचं म्हणून घरातल्या भिंतीवर खास रणबीरचा फोटो लावून घेतलाय.”
-
“माझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ती भिंत आवडते.” असंही अभिनेत्रीने सांगितलं.
-
दरम्यान, ऋतुजा बागवेच्या घरातील साध्या आणि आकर्षक सजावटीचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

नारायण मूर्ती अन् बिल गेट्सनंतर आता थरूर यांची कामाच्या तासांच्या वादात उडी; ‘हे’ विधान करत म्हणाले…