-
बॉलिवूड स्टार्स चित्रपट आणि जाहिरातींमधून काम करून कोट्यवधी पैसे कमवतात. परंतु काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या कमाईचा स्रोत फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही. अनेक कलाकार आपली मालमत्ता भाड्याने दिल्यामुळे दर महिन्याला चांगली कमाईही करतात. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल ज्यांनी आपली आलीशान घरे भाड्याने दिली आहे आणि यामधून ते मोठी कमाई करतात.
-
ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननला मुंबईतील अंधेरी भागात असलेले त्यांचे घर, डुप्लेक्स हे भाड्याने दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती सॅनन या घराचे दर महिन्याला १० लाख रुपये भाडे भरते. -
मलायका अरोराने तिचे अपार्टमेंट कॉस्च्युम डिझायनर कशिश हंस यांना भाड्याने दिले आहे, ज्यातून ती दरमहा १.५७ लाख रुपये कमवते.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे पुण्यातील अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. यासाठी तिला दरमहा २ लाख रुपये भाडे मिळते.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपले पुण्यातील ट्रम्प टॉवरमधील अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. या अपार्टमेंटचे भाडे म्हणून अभिनेत्याला दरमहा ४ लाख रुपये मिळतात.
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला त्याच्या वांद्रेतील अपार्टमेंटचे दरमहा ३.५ लाख रुपये भाडे मिळत आहे.
-
अभिनेता सलमान खानला आपल्या वांद्रेतील अपार्टमेंटसाठी दरमहा १.५ लाख रुपये भाडे मिळते.
-
बॉलिवूड स्टार शाहिद कपूरने अभिनेता कार्तिक आर्यनला आपला फ्लॅट भाड्याने दिला आहे. यासाठी शाहिदला दर महिन्याला ७.३० लाख रुपये भाडे मिळते.
(फोटो स्रोत: फेसबुक)
![tharala tar mag marathi serial news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/tharla-tar-mag.jpg?w=300&h=200&crop=1)
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो