-
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे.
-
रितेशने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची नावं जाहीर केली आहे. ( अभिनेते अमोल गुप्ते )
-
‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल.
-
याशिवाय अभिषेक बच्चन देखील रितेशच्या सिनेमात झळकणार आहे.
-
बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर ‘राजा शिवाजी’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतील. याशिवाय सचिन खेडेकर देखील या सिनेमात झळकणार आहेत.
-
९० च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल.
-
अभिनेता फरदीन खान आणि लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशी हे कलाकार देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा भाग असतील.
-
रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. ती चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
-
अजय-अतुल ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. हा सिनेमा १ मे २०२६ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रितेश देशमुख इन्स्टाग्राम )

एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस