-
इंग्लंडमधील कोव्हेंट्री येथे राहणाऱ्या डोरोथी डोनेगन यांनी नुकताच आपला १०२ वा वाढदिवस साजरा केला. (LeicestershireLive)
-
क्लेरेंडन हाऊस केअर होम येथे त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत, त्यांनी सँडविच, बिस्किटे आणि केक खाण्याचा आनंद लुटला. त्यांनी कोव्हेंट्रीलाइव्हसह आपल्या तिच्या बालपणीच्या सर्वात आवडत्या आठवणी शेअर केल्या आणि आपल्या दीर्घायुष्याचं गुपित सांगितलं.
-
आपल्या दीर्घायुष्याबद्दल डोरोथी सांगतात की आपले कौटुंबिक आयुष्य खूप महत्त्वाचे आहे. त्या म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद लुटला. माझं आयुष्य हे अतिशय चांगलं आयुष्य होतं. माझं कुटुंब खूप मोठं होतं. माझे आईवडीलही खूप चांगले होते. आम्ही खूप खेळायचो.”
-
त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही सर्व प्रकारचे खेळ खेळायचो. माझे वडील मोठे डोमिनोज खेळाडू होते. ते पबमध्ये डोमिनोज खेळायचे. तसेच आम्ही पत्तेही खेळायचो.”
-
डोरोथी यांनी गेराल्ड यांच्याशी लग्न केले. त्यांनी ५३ वर्षे एकत्र घालवली. तसेच त्यांनी त्यांच्या मुलाचा म्हणजेच जॉनचा जन्म होईपर्यंत कॉव्हेंट्रीमधील स्टँडर्ड मोटर कंपनीत काम केले.
-
आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व चढ-उतारांचा सकारात्मक दृष्टीने सामना करण्याची शिकवण डोरोथी देतात.
-
डोरोथी यांचे आयुष्य खूपच सुखकर होते असेही नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी त्यांच्या लहानपणीच आपला लहान भाऊ गमावला. त्यांचा भाऊ मोटारसायकल चालवताना मारला गेला.
-
आपल्या भावाची आठवण काढताना त्या म्हणाल्या, “त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. डेव्हसाठी तो खूप दुःखाचा दिवस होता. तो एक चांगला भाऊ होता. त्याचे जीवन आनंदाने आणि हास्याने परिपूर्ण होते.”
-
दैनंदिन दिनचर्याही तितकीच महत्त्वाची आहे. डोरोथी म्हणतात आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहणे आवश्यक आहे.
-
आजकाल, डोनेगनच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बोर्ड गेम खेळणे, शब्द शोधणे आणि मासिके वाचणे यासारख्या आरामदायी क्रियाकलापांचा समावेश आहे. त्यांना टीव्हीवर क्विझ शो बघायलाही आवडते.
-
आपले आवडते अन्नपदार्थ खाऊन मनाला संतुष्ट ठेवणेही अतिशय आवश्यक आहे. डोरोथी अधूनमधून एक ग्लास वाईन पितात. तसेच त्या रोज केकची एक स्लाइसही खातात. मात्र त्यांना चहाबरोबर बिस्किटे खाणे सर्वांत जास्त आवडते.
-
डोरोथी म्हणतात, “मला एक कप चहा पिणे फार आवडते. चहा प्यायल्यानंतर अमृत प्यायल्यासारखे भासते.” (सर्व प्रातिनिधीक फोटो: Pexels)
योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिम समाजाविषयी केलेलं ‘ते’ विधान भोवलं?