-
दही हा आपल्या रोजच्या आहारातील एक मुख्य पदार्थ आहे. दही त्याच्या प्रो-बायोटिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. जेवणाची चव वाढविण्यासाठी अनेकदा दही वापरले जाते. काही लोकांना साखर किंवा मीठ टाकून नुसते दही खायला आवडते.
-
. पण, दह्यात मीठ टाकावे की साखर, असा प्रश्न अनेक आरोग्यप्रेमींना पडतो. दोन्हीपैकी आपल्या आरोग्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, असा वाद अनेकदा होतो. याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊ.
-
दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक यांच्या कनिक्का मल्होत्रा यांनी सांगितले, “साखर असलेल्या दह्याचे सेवन केल्यास त्यातील साखरेमुळे अधिक कॅलरीज मिळतात. मध्यम प्रमाणात मीठ टाकून दह्याचे सेवन केल्यास कॅलरीचा प्रभाव नगण्य असतो.”
-
मिठाच्या तुलनेत साखर कार्बोहायड्रेटचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवते; पण त्यामध्ये काहीही पोषक घटक नसतात. मीठ असलेले दही शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढवते, जे इलेक्ट्रोलाइट समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे आहे
-
; परंतु त्याचे सेवन करताना संयम आवश्यक आहे. विशेषत: उच्च रक्तदाब असलेल्यांनी काळजी घ्यावी.
-
मीठ आणि साखर हे दोन्ही पर्याय दह्यातील प्रथिने, कॅल्शियम आणिआतड्यातील चांगले जीवाणू (प्रो-बायोटिक्स) यांसारखे मूळ पोषक घटक टिकवून ठेवतात. पण, ज्यांना मधुमेह किंवा वजनावर नियंत्रण ठेवायचे हे त्यांनी मीठ टाकून दही खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
-
दह्यामध्ये मीठ किंवा साखर मिसळल्याने पचन आणि आतड्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
मल्होत्रा सांगतात, “दह्यात मीठ टाकल्याने आतड्यातील जीवाणूंवर थेट परिणाम होत नाही. हे पोटातील अॅसिडचे उत्पादन वाढवू शकते, काहींमध्ये पचनास मदत करते. -
जर जास्त साखर टाकून दह्याचे सेवन केल्याने आतड्यातील मायक्रोबायोमचे संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे दह्यातील प्रो-बायोटिक्समुळे मिळणारे फायदे कमी होतात.
-
मीठ असलेले दही किंवा साखर असलेले दही नेहमी खाण्याचे संभाव्य फायदे आणि तोटे .
मीठ असलेले दही :
फायदे: इलेक्ट्रोलाइट संतुलनास समर्थन देते, तृप्तीची भावना वाढवते, प्रो-बायोटिक फायदे टिकवून ठेवते. -
मीठ असलेले दही :
तोटे : कॅलरीचे सेवन वाढते, रक्तातील साखरेची पातळी वाढते, जास्त साखर असलेले दही खाल्ल्यास प्रो-बायोटिक्समुळे मिळणारे फायदे कमी होतात. -
साखर असलेले दही:
फायदे: जलद ऊर्जा निर्माण करते, गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी चविष्ट पर्याय -
साखर असलेले दही:
तोटे: कॅलरीचे सेवन वाढते, रक्तातील साखरेची पातळी वाढते, जास्त साखर असेलेल दही खाल्यास प्रोबायोटिक्समुळे मिळणारे फायदे कमी होतात. -
मल्होत्रा यांच्या मते, काही विशिष्ट सांस्कृतिक आणि पाकविषयक संदर्भांनुसार मीठ किंवा साखर टाकलेले दही तयार करण्याची वेगवेगळी पद्धत आहे.
-
मीठ असलेले दही : जगभरातील चवदार पदार्थांमध्ये सामान्यतः रायता (भारत), डिप्स (भूमध्य), सॅलड सजावटीसाठी दही असलेले मीठ वापरतात, जे या पदार्थाची चव वाढवते.
-
साखर असलेले दही : दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय लस्सी, फळे व मध या नाश्त्यामध्ये साखर असलेले दही वापरतात.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case