
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जर्मनीतील म्युनिकमध्ये (PM in Munich) विमानतळावर दाखल झाले.
येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्युनिकमध्ये संगीतमय शैलीत स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जर्मनीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता. खांद्यावर शाल घेतली होती.
या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील अनेक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी हजारो परदेशी भारतीय तेथे पोहोचले होते.
पंतप्रधानांनी तेथे उपस्थित भारतीयांशी, विशेषत: लहान मुलांची भेट घेऊन चर्चा केली.
म्युनिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहताच तेथील भारतीय नागरीकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.
जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दहशतवाद, पर्यावरण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर जगाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.