-
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
-
यासाठीची जय्यत तयारी राष्ट्रपती भवनात सुरू आहे. आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकारी शपथ घेणार आहेत.
-
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
-
दरम्यान महाराष्ट्रातीलही पाच खासदारांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आले आहे.
-
यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि रिपाईचे रामदास आठवले यांना संधी मिळाली आहे. या सर्वांचं अभिनंदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे, त्यांना कोणतं मंत्रिपद दिलं जातं हे मात्र अजून कळलेलं नाही.
-
नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, हे या आधीच्याही मंत्रिमंडळामधील मंत्री आहेत ते दुसऱ्यांदा मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मात्र यावेळेस कोणतेही मंत्रिपद दिले जात नसल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
-
दरम्यान, काही वेळातच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..