-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाद्वारे १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
-
ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार, काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडिकुनिल सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव केला.
-
यापूर्वी १९५२, १९६७ आणि १९७६ साली लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही चौथी वेळ होती.
-
ही निवडणूक जिंकून भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवणार्या अय्यंगार आणि जीएमसी बालयोगी यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश झाला आहे.
-
बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते.
-
१९८५ मध्ये काँग्रेसचे बलराम जाखड यांच्यानंतर, कोटा लोकसभेतून सर्वोच्च पदावर पुन्हा निवडून आलेले ३९ वर्षांतील ते पहिले अध्यक्ष ठरले.
-
बिर्ला हे पहिले अध्यक्ष होते, ज्यांनी खासदारांना त्यांच्या भाषणांच्या क्लिपिंग्स सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली.
-
त्यांनी चर्चेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विधेयके किंवा धोरणांवर खासदारांसाठी ब्रीफिंग सत्रांची एक नवीन प्रणालीदेखील सुरू केली.
-
वसाहतकालीन इमारतीतून संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर, हे बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
-
लोकसभेचे अध्यक्ष हे देखील संसदेचे सदस्य असतात. १९५४ च्या कायद्यानुसार लोकसभा अध्यक्षांना पगारासह भत्ते आणि पेन्शनही मिळते.
-
१९५४ च्या कायद्यात २०१० मध्ये सुधारणा करण्यात आली. लोकसभा अध्यक्षांना खासदार म्हणून एक लाख रुपये पगार मिळतो.
-
याशिवाय त्यांना अतिरिक्त भत्तेही मिळतात. अध्यक्षांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळासाठी संसदेच्या अधिवेशनांना किंवा इतर समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज भत्ता दिला जातो.
-
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन, अतिरिक्त भत्ता, प्रवास भत्ता, मोफत निवास, मोफत वीज आणि मोफत फोन यांसारख्या सुविधा मिळतात.
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर