
भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

भारतीय संघ हा अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला.

संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाचे विजयामध्ये मोठे योगदान आहे.

तीने अवघ्या २३ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावले.

स्मृतीच्या खेळीनंतर चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

भारताने इंग्लंडला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्यामुळे इंग्लंडला परावभ स्वीकारावा लागला.

भारताची नजर आता सुवर्णपदक जिंकण्यावर आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)