
त्वचेच्या कोणत्याही भागावर हलका चावा घेतल्याने काही वेळा लाल किंवा निळसर रंगाचे डाग उठतात, ज्याला लव्ह बाईट, हिक्की असंही म्हणतात. अनेकदा महिला, पुरूष लव्ह बाईट लपवण्याचा प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य – Pixabay)
मात्र हे डाग लपवणं काही वेळा मुश्किल होतं. या लव्ह बाईट्सच्या समस्येवर काही घरगुती उपायही आहेत. जाणून घ्या या उपायांबद्दल…(फोटो सौजन्य – Pixabay)
केळ्याची साल देखील डाग दूर करण्यास मदत करते. हे साल थंड आणि आराम देते. यामुळे लव्ह बाईटच्या खुणांवर केळीची साल लावू शकता. (फोटो सौजन्य – Indian Express)
अल्कोहोलमध्ये थंडपणा आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे कापसाने अल्कोहोल या खुणांवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर तिथे मॉइश्चरायझर लावा. यानेही खुणा पुसट होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – Indian Express)
अननसाचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून लव्ह बाईटच्या खुणांवर लावा. दिवसातून तीन ते चार वेळा याचा वापर केल्याने तुमचे डाग हलके होतील. (फोटो सौजन्य – Indian Express)
एक चमचा घ्या आणि नंतर काही तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर काही वेळ चमच्याने लव्ह बाईटच्या खुणांवर मालिश करा. यामुळे देखील डाग दूर होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Indian Express)