-
पुणे : चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो.
-
त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंगळवारी करण्यात आला.
-
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आणि सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली.
-
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले होते.
-
सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो.
-
फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे.
-
ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.
-
मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती.
-
भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
-
नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.
-
गणपती बाप्पा मोरया… (सर्व फोटो सौजन्य : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती / फेसबुक)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल