-
राज्यामध्ये मोसमी पावसाला जबरदस्त सुरुवात झाली आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
गेल्या दोन दिवसांपासून अखेर मुंबईतही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
मुंबईतील काही भागात पाणीही साठलं आहे. मुंबईत रोज पहाटेपासून पावसाची संततधार सुरु होते. तर दिवसभर ये-जा सुरूच असते. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
दरम्यान, मुंबईकर पावसाची मजा घेण्यासाठी मरीन ड्राईव्हवर पोहचत असतात. यंदाही लोक तिथे पोहचले आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
तसेच मरीन ड्राईव्हवरील समुद्रकिनारी लोक त्यांच्या मित्र, आप्तेष्ठ यांच्यासह त्यांचा वेळ घालवण्यासाठी येत असतात. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील ही आजची (२२ जून २०२४) छायाचित्रे आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
यावेळी काहीवेळच्या विश्रांतीनंतर परत पाऊस सुरु झाल्याने बाहेर पडलेले लोक छत्री घेऊन उभे आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
तर काही लोक पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
पावसाच्या लपंडावाचा खेळ सुरु असल्याने, तो आला की लोक छत्री उघडतात आणि गेला की लगेच बंद करतात. मरीन ड्राईव्ह येथे बऱ्याच दिवसाच्या उकाड्याने त्रस्त असलेले मुंबईकर थंड झालेल्या वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar) हेही पहा- PHOTOS : दक्षिण चीनमध्ये पुराचे थैमान; भूस्खलनामुळे दळणवळण खंडित तर ४० जण दगावले!…

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज