-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagadusheth Halwai Ganpati Pune) बुधवारी आंब्यांची सजावट करण्यात आली होती.
-
देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने गणरायाला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
-
अक्षय्य तृतीया, ‘आंबा महोत्सव’निमित्त बाप्पांच्या मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
झेंडूच्या फुलांनी साकारलेल्या आब्यांनो मंदिराची सजावट आणि आंब्यांनी सजलेले गणरायाचे मनोहारी रूप भाविकांनी डोळ्यांमध्ये साठवून घेतले आणि मोबाईलमध्ये बंदिस्त केले.
-
आंबा महोत्सवनिमित्त बाप्पांना आंब्यांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.
-
भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
-
मंदिरात पहाटे गायिका वेदश्री खाडिलकर-ओक व सहकारी यांनी स्वराभिषेक सादर केला.
-
सजावटीतील हे आंबे वंचित घटकातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि ससून रुग्णालयातील रुग्णांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत, असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
-
पौराणिक ग्रंथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता, तसेच या दिवशी देवी गंगादेखील पृथ्वीवर अवतरली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फेसबुक पेज)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या