-
एकेकाळी पैसा कमवायचा म्हटलं तर नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे अशी समजूत होती. पण सध्या जेव्हा सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम झालं आहे ज्यामुळे कमाईचे वेगवेगळे मार्गही निर्माण झाले आहेत. फक्त मोठेच नाही तर अनके लहान मुलंही सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झाले असून लाखो रुपये कमावत आहेत. असाच एक चिमुरडा सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध असून इतके पैसे कमावत आहे जितका अनेकांचा महिन्याचा पगार नसेल.
-
बेबी ब्रिग्गस (Baby Briggs) हा आतापर्यंत सर्वात लहान ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे.
-
बेबी ब्रिग्गस (Baby Briggs) हा अमेरिकेचा असून फक्त फिरुन तो है पैसे कमावतो.
-
डेली मेलनुसार, बेबी ब्रिग्गसने (Baby Briggs) आतापर्यंत अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा अशा एकूण १६ राज्यांना भेट दिली आहे.
-
त्याने आतापर्यंत ४५ वेळा विमान प्रवास केला आहे.
-
बेबी ब्रिग्गसची (Baby Briggs) आई जेसच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी १४ ऑक्टोबरला त्याचा जन्म झाला.
-
फक्त तीन महिन्याचा असतानाच तो पहिल्या ट्रिपवर गेला होता.
-
बेबी ब्रिग्गसने (Baby Briggs) इतक्या लहान वयात अलास्का, यल्लोस्टोन नॅशनल पार्कमधील कोल्हे, समुद्र अशा अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत.
-
बेबी ब्रिग्गसचे (Baby Briggs) इन्स्टाग्रामवर ३० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
बेबी ब्रिग्गसची (Baby Briggs) आई जेस Part Time Tourists नावाने ब्लॉग चालवत असून जग फिरण्यासाठी आपल्याला पैसे दिले जातात असं त्यांनी सांगितलं आहे.
-
“मी जेव्हा २०२० मध्ये गर्भवती होते तेव्हा करिअर संपेल अशी भीती वाटत होती. पण बाळासोबतही ते मी सुरु ठेवू शकते याची कल्पना नव्हती,” असं जेसने सांगितलं आहे.
-
“माझ्या पतीला आणि मला हे खरंच सुरु ठेवायचं होतं. म्हणून मी बेबी ट्रॅव्हलसंबंधी सोशल मीडिया अकाऊंट्स पाहण्यास सुरुवात केली. मला एकही सापडलं नाही. ती पोकळी भरुन काढण्यासाठी मी जे काही चांगलं वाईट शिकलं आहे ते माझ्या बाळासोबत फिरत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्याचं ठरवलं. यातून पहिल्यांदा पालक होणाऱ्यांना मदत करण्याचाही हेतू होता,” असं जेसने सांगितलं आहे.
-
करोना काळातही कुटुंब सर्व नियमांचं पालन करत आणि काळजी घेत प्रवास करत होतं.
-
त्यांनी रस्त्याने प्रवास करण्याला प्राधान्य दिलं होतं. तसंच स्थानिक ठिकाणी सुट्ट्यांसाठी जात होते, जिथे सोशल डिस्टन्स पाळणं शक्य होतं.
-
“आम्ही मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणं टाळलं होतं. त्यामुळेच आम्ही न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी गेलो नाही. त्याऐवजी आम्ही जास्त कोणाला माहिती नसणाऱ्या ठिकाणी भेट देऊन सर्वांसमोर आणत होते,” असं जेसने डेली मेलशी बोलताना सांगितलं.
-
बेबी ब्रिग्गसला (Baby Briggs) स्पॉन्सरदेखील आहेत, जे मोफत डायपर देतात.
-
जेसने आपण बाळासोबत फिरणं थांबवणार नसल्याचं सांगते.
-
जेस पुढच्या सहा महिन्यात बाळाला घेऊन युरोप, लंडन अशा ठिकाणांनाही भेट देणार आहे.
-
दरम्यान बेबी ब्रिग्गस (Baby Briggs) महिन्याला किती कमावतो माहितीये का? त्याच्या कमाईचा आकडा पाहून तुम्हीदेखील तोंडात बोटं घालाल.
-
बेबी ब्रिग्गस (Baby Briggs) महिन्याला १००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५ हजार रुपये कमावतो.
-
(All Photos: Instagram)

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा