
मुंबई : ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’मध्ये तब्बल पंधरा वर्षांनी वाघाच्या बछड्यांचा जन्म झाला असून नवजात मादी पिल्लाचे नामकरण ‘वीरा’ असे करण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ‘ऑस्कर’ असे ठेवण्यात आले आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
जिजामाता उद्यानात कित्येक वर्षे वाघ नव्हते. (फोटो : निर्मल हरिंद्रन, इंडियन एक्सप्रेस)
या जोडीने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
या बछड्याचे नामकरण मंगळवारी ‘वीरा’ असे करण्यात आले. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
करिश्मा वाघीण ही सध्या आपल्या बछड्याच्या संगोपनात गुंतली आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
वीराला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून लवकरच लसीकरण केले जाणार आहे. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)
प्राणिसंग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ट-फ्लिपर या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला. (फोटो : The Mumbai Zoo / फेसबुक)