-
‘वडा पाव गर्ल’ म्हणून संपूर्ण देशात लोकप्रिय असलेली चंद्रिका गेरा दीक्षित ‘बिग बॉस OTT 3’मध्ये दिसणार आहे.
-
सगळीकडेच सध्या ‘वडा पाव गर्ल’चीच चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर बहुतेकांना तिच्या खाजगी जीवनाबाबत जाणून घ्यायचं आहे.
-
चंद्रिकाचे बालपण अनेक अडचणींमध्ये गेले. लहानपणीच तिने तिच्या आईला गमावले. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि चंद्रिकाला नातेवाईकांकडे सोडले.
-
नंतर चंद्रिकाचे संगोपन तिच्या आजीने केले. हेच कारण आहे की ती आजही तिच्या आजीच्या खूप जवळ आहे.
-
चंद्रिकाचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या पतीचे नाव युगम गेरा उर्फ यश गेरा असे असून त्यांना ध्रुव नावाचा मुलगा आहे.
-
यश गेराचा जन्म १९९१ मध्ये उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये झाला. त्याने इंजिनीअरिंग केले आहे
-
एकेकाळी चंद्रिका हल्दीराममध्ये काम करायची, तर तिचा नवराही खाजगी नोकरी करायचा.
-
मात्र त्यांच्या मुलाच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दोघांनीही नोकरी सोडली. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चंद्रिकाने दिल्लीच्या रस्त्यावर वडा पाव स्टॉल सुरू केला.
-
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंद्रिका संपूर्ण देशात ‘वडा पाव गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आता त्यांचे वडापावचे स्वतःचे दुकान आहे.
-
सध्याच्या घडीला चंद्रिका सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाली आहे. आता तर ती ‘ बिग बॉस ओटीटी 3’मध्येही नशीब आजमावताना दिसेल. (सर्व फोटो: Instagram)
एकेकाळी प्रसिद्ध कंपनीत काम करत होती ‘वडापाव गर्ल’; ‘या’ कारणामुळे नोकरी सोडून सुरू केली वडापावची गाडी
सगळीकडेच सध्या ‘वडा पाव गर्ल’चीच चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर बहुतेकांना तिच्या खाजगी जीवनाबाबत जाणून घ्यायचं आहे.
Web Title: Once worked in a famous company vadapav girl because of this reason chandrika gera quit job and started vadapav car pvp