-
Vaishnavi Hagawane Death: पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
-
वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती.
-
वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
-
वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.
-
लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या.
-
पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आले होते.
-
वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
-
‘Brides Affair Pune’ या इन्स्टाग्रामवरील पेजने शेअर केलेले वैष्णवीच्या लग्नातील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता.
-
वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता.
-
विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला.
-
वैष्णवीच्या घरातल्यांनी थाटात तिचे लग्न करुन दिले होते.
-
मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता.
-
वैष्णवीच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलगी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटले होते. पोलीस तक्रारही केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : Brides Affair Pune/इन्स्टाग्राम)

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक