-
सध्या राज्यभर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्यांची हकालपट्टी करण्यात आली असे मुळशीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून होती.
-
राजेंद्र हगवणे हे राजकीय पुढारी राहिले आहेत, त्यांनी २००४ साली विधानसभा निवडणुकीत राजकीय नशीब आजमावलं होतं पण त्यांचा पराभव झाला होता.
-
दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येप्रककरणात आता तिचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा व मोठा दीर सुशील या फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-
वैष्णवीच्या विवाहासाठी तिच्या आई-वडिलांकडून ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि इतर महागड्या वस्तू हगवणे परिवाराने घेतल्या होत्या. याशिवाय लग्नानंतरही वारंवार पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
-
हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे जगतापने अशी माहिती दिली आहे की, तिचाही छळ करण्यात आला आहे. तिला मारहाणही केली गेली. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली मात्र पुढे काहीही झालं नसल्याचं तिने सांगितलं आहे.
-
माध्यमांना मुलाखत देताना मयुरीने सांगितले की हगवणे कुटुंबाचा व्यावसाय हा बांधकाम, जमिनीचे व्यवहार करणे असा राहिला आहे.
-
याशिवाय जेसीबी, पोकलँडसारख्या मशिनरीतूनही पैसा कमावत असल्याचे मयुरीने सांगितले आहे.
-
दरम्यान, या प्रकरणात पुढे काय होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case