राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक गुरुवारी (दि. २३ मार्च) संपन्न झाली. निवडणूक आयोगासमोर जाऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) विरोधकांचे आक्षेप पुन्हा एकदा लेखी स्वरूपात मांडण्याचा ठराव या बैठकीत संमत झाला. जगातील प्रत्येक मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते, या आपल्या जुन्या विचारावर विरोधक अद्यापही ठाम असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला काँग्रेस समाजवादी पक्ष, जेडीयू, आप, सीपीआय, सीपीएम, शिवसेना (यूबीटी), बीआरएस, आययूएमएल या पक्षातील नेते आणि कपिल सिब्बल उपस्थित होते.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांच्या मनातील ईव्हीएम मशीनबद्दलची शंका समजून घ्यावी. ईव्हीएम मशीन्स या बाह्ययंत्रणेशिवाय (standalone) चालणाऱ्या आहेत, असे निवडणूक आयोग सांगत असले तरी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनवरील नावे आणि पक्षाच्या चिन्हामध्ये गडबड होऊ शकते.
तसेच या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, विरोधकांची अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाने आमच्या मागणीची दखल घ्यावी. सिब्बल म्हणाले की, मागच्या काही काळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरे निवडणूक आयोगाकडून येणे अपेक्षित आहे.
सिब्बल पुढे म्हणाले, “आम्ही पुन्हा एकदा निवडणूक आयोगापुढे जाऊ. निवडणूक आयोगाने आम्हाला लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करणार आहोत. जर आयोगाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, तर मग भविष्यात कोणती पावले उचलायची, याचा विचार करू. जगातील कोणत्याही मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते. जगभरातील युरोप, यूके, यूएस यांसारख्या मोठ्या लोकशाही देशांमध्ये निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरली जात नाहीत. यातच सर्व आले.”