“बिहारचे मुख्यमंत्री म्हणजे ‘जुमला’(हवेतील आश्वासने) नसून ‘हकिगत’ (वास्तव) आहेत.” “मन की नही, काम की (मनाची नव्हे, कामाची गोष्ट) अशा आशयाची पोस्टर सध्या लागलेली आहेत. आणखी एका पोस्टरवर नीतिश यांच्या छायाचित्रासह ‘एक समाज, श्रेष्ठ समाज” २०२४ ची हमी देण्यात आली आहे. तर चौथ्या एका पोस्टरवर लवकरच “परिवर्तन” दिसणार, सुरुवात झाली आहे असा आशय वाचायला मिळाला.
जनता दल (संयुक्त) एनडीए’मधून बाहेर पडून महागठबंधन स्थापन केल्यावर सुमारे ३०० जणांचे शिष्टमंडळ दोन दिवसीय बैठकांना हजेरी लावण्याची शक्यता आहे.. पक्षाच्या बिहार कार्यालय पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू झाली आहे. एनडीए’समवेत फारकतीला जबाबदार असलेल्या मुद्यांचा वेध राज्याच्या कार्यकारिणी बैठकीत घेतला जाईल. आता पक्षाची पुढील दिशा व राष्ट्रीय कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष आहे.
याबाबत स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय आणि विरोधकांसाठी दोन ठराव निघण्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात माहिती देताना जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय सहसचिव आफाक अहमद म्हणाले, “नियोजित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीत पारित केलेल्या ठरावांना आमच्या राष्ट्रीय परिषदेद्वारे मान्यता दिली जाईल, जी संस्थेतील सर्वोच्च संस्था आहे.”
जनता दल (संयुक्त)चे प्रवक्ता के सी त्यागी यांनी मान्य केले: “आम्हाला भाजपाच्या विरुद्ध मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भरून पावले आहे. वेगवगेळ्या पक्षांचे नेते जसे की, सीपीएम’चे सीताराम येचूरी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे तसेच सीपीआय’चे डी राजा यांनी आमच्याशी संपर्क साधला. नीतिश कुमार विरोधक म्हणून आवाज उंचावण्यास आधीपासूनच सज्ज आहेत. हा आमचा टॉप अजेंडा राहील.. आगामी महिन्यांतील आमच्या कामकाजाची दिशा चर्चेअंती स्पष्ट होईल.”
दोन दिवसीय बैठकीनंतर पक्षाची संघटनात्मक भूमिका, पंचायतीपासून राज्यस्तरीय मार्गक्रम स्पष्ट होणार आहे. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना नीतिश कुमार म्हणाले, “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अजिबात सक्रीय नाही. येत्या दोन दिवसांत पक्षाविषयी काही गोष्टी स्पष्ट होतील. ही बैठक त्याकरिता आयोजित करण्यात आली आहे.”