संतोष प्रधान

राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे. उभयता एकाच जिल्ह्यातील. दोघांमध्ये राजकीय स्पर्धा. उभयता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. आता या दोघांमध्ये एक नवाच योगायोग जुळून आला आहे. सत्तांतरानंतर आधी बाळासाहेब थोरातांकडे असलेले महसूल खाते आपल्याकडे घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरात राहत असलेला बंगलाही रॉयलस्टोन बंगलाही आपल्याकडे घेतला आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश झाला. मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल हे खाते वाट्याला आले. गृह, वित्तपाठोपाठ महसूल हे महत्त्वाचे खाते समजले जाते. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते होते. शिंदे सरकारमध्ये महसूल हे खाते विखे-पाटील यांच्याकडे आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढ्यावर हे थांबले नाही. मंत्र्यांच्या निवासस्थान वाटपात विखे-पाटील यांच्या वाट्याला राॅयलस्टोन बंगला आला आहे. मावळत्या सरकारमध्ये हा बंगला बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. खाते आणि बंगला थोरातांकडून विखे-पाटील यांच्याकडे गेले आहे. विखे-पाटील आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष नगर जिल्ह्यात सर्वश्रूत आहे. विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्यात कधीच सख्य नव्हते. दोघांचे मतदारसंघ शेजारीशेजारी. दोघेही निवडणुकीत परस्परांना शह देण्याचा प्रयत्न करतात.