उत्तराखंडमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगासह उमेदवारांनीही तयारी केली आहे. तर काँग्रेस आणि भाजपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच बसपा पहाडी लोकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मतदारांचा दृष्टिकोन बदलण्यात भाजपाचे स्टार प्रचारक बऱ्याच अंशी यशस्वी होत आहेत. सध्या उत्तराखंडच्या पाचही लोकसभा जागा भाजपाच्या खासदारांकडे आहेत आणि त्यावर वर्चस्व राखणे भाजपासाठी आव्हान आहे, कारण काँग्रेसच्या उमेदवारांनीही रणांगणात पूर्ण ताकद लावली आहे. तसेच अपक्षांनीही भाजपा-काँग्रेसला अडचणीत आणण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या रॅलीचे उत्तराखंडमध्ये नियोजन केले होते. तर काँग्रेस अजून आढावा घेण्यातच गुंतलेली असल्याचे दिसते. एआयसीसीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात रॅलीला संबोधित करणाऱ्या एकमेव राष्ट्रीय स्तरावरील नेत्या आहेत. भाजपा मोदी फॅक्टर आणि त्याच्या अलीकडील यशस्वी योजना अन् मुद्द्यांची जाहिरात करीत आहे, ज्यात समान नागरी संहिता (UCC) विधेयक मंजूर करणे आणि शेजारच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा यासह कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Mohite-Patil, Madha, Mohite-Patil Madha,
माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली
“मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान; फडणवीसांचाही उल्लेख!
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

“मोदीजींच्या ४०० पार टार्गेटनुसार आमचे लक्ष्य केवळ सर्व पाच जागा जिंकणे नाही, तर प्रत्येक जागेवर पाच लाख मतांच्या फरकाने विजय सुनिश्चित करणे हे आहे,” असे भाजपाचे गढवालचे उमेदवार आणि माजी राज्यसभा खासदार अनिल बलूनी म्हणाले. दुसरीकडे काँग्रेस एक छुपी मोहीम राबवत असल्याचे दिसते. केंद्राच्या अग्निपथ योजना, अंकिता भंडारी खून प्रकरण, बेरोजगारी आणि निवडणूक रोख्यांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या सत्ता विरोधी लाटेवर काँग्रेसला स्वार व्हायचे आहे. तर काँग्रेसला अनेक जण सोडून गेले आहेत. गेल्या महिनाभरात काँग्रेस पक्षातून अनेक नेते सोडून भाजपात गेले आहेत. बद्रीनाथचे आमदार राजेंद्र सिंह भंडारी, माजी मुख्यमंत्री बी सी खंडुरी यांचे पुत्र मनीष खंडुरी यांचा समावेश आहे. तसेच हरीश रावत यांच्या अनेक निकटवर्तीयांनीही काँग्रेसशी संबंध तोडले आहेत.

प्रियांका वाड्रांच्या रॅलीमुळे निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. काँग्रेस बऱ्याच जागा लढवत आहे आणि राज्यातील सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही उत्तराखंड काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या गरिमा मेहरा दासौनी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचा आत्मा हा जाहीरनामा असतो. भाजपाने दोन आठवड्यांपूर्वीच जाहीरनामा समिती स्थापन केली, तर आम्ही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची स्थापना केली. भारत जोडो न्याय यात्रेद्वारे आम्ही लोकांच्या अपेक्षा अन् मागण्या ऐकल्या. आम्ही त्या योजनांनुसार पुढे जात आहोत आणि राज्यातील जनताच आमची स्टार प्रचारक आहे,” असंही त्यांनी सांगितलं. २०१९ च्या निवडणुकीत पाचही जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा हरिद्वार आणि गढवालमध्ये काँग्रेसचे कडवे आव्हान आहे. तिथे पक्षाने माजी मुख्यमंत्री हरीश यांचा मुलगा वीरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे.

२०१९ मध्ये माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जिंकलेल्या जागेवरून भाजपाचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी वीरेंद्र यांची लढत होणार आहे. या लढतीत राज्यातील काँग्रेसचे सर्वात वजनदार नेते असलेले रावत कोणतीही कसर सोडणार नाहीत. कारण त्यांच्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी उर्वरित मतदारसंघात प्रचार करण्यास सक्षम नसल्याबद्दल सहकारी पक्ष नेत्यांची माफी मागितली आहे, त्यावरून त्यांचं हरिद्वारवर किती लक्ष आहे ते समजते.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत लालकुआनमधून भाजपाच्या मोहन सिंग बिश्त यांच्याकडून झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये रावत यांनी जोरदार शक्ती पणाला लावली आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा या दोन्ही जागा गमावल्या. माजी मुख्यमंत्र्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत नैनिताल-उधम सिंग नगर मतदारसंघातून पराभवाची चव चाखली, जिथे ते भाजपाचे उमेदवार अजय भट्ट यांच्याकडून ते पराभूत झाले. दुसरीकडे गोदियालची लढत बलूनी यांच्याविरुद्ध होणार आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपाच्या धनसिंग रावत यांच्याकडून ५८७ मतांच्या फरकाने पराभूत झाले. भाजपाचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी २०१९ मध्ये ही जागा तीन लाखांहून अधिक मतांनी जिंकली होती. उर्वरित तीन मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे.