राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमनेसामने आलेले शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या चुलत बहिणीच्या विरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही बारामती मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. यावरून ते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया यांनी २००९ पासून सलग तीन वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, २००६ ते २००९ या काळात त्या राज्यसभा सदस्य होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. “सुनेत्रा पवार यांना लोकसभेवर निवडून द्यावे, अशी बारामतीतील कार्यकर्त्यांची मागणी आणि इच्छा आहे. बारामती मतदारसंघात त्या दीर्घकाळापासून सामाजिक कार्य करीत असून, त्यांचे पती या भागाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपाने महाराष्ट्रातील १६ कठीण जागांमध्ये बारामतीचाही समावेश केला आहे. ही जागा सत्ताधारी शिंदे सेना-भाजपा-अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हिसकावून घेण्याची आशा आहे.

कोण आहेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकीय कुटुंबातून आल्याने त्यांच्यासाठी राजकारण काही नवs नाही. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री आहेत. सुनेत्रा आणि अजित पवार यांना जय आणि पार्थ पवार ही दोन मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जय कौटुंबिक व्यवसाय पाहतो, तर राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला पार्थ २०१९ ची लोकसभा निवडणूक मावळमधून हरला. सुनेत्रा पवार या बारामतीतील सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सुनेत्रा पवार २०१० मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. भारतातील इको-व्हिलेज संकल्पना विकसित करण्यात त्या एक मार्गदर्शक होत्या. सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणूनही काम करतात, असेही संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर सुनेत्रा पवार २०११ पासून फ्रान्समधील वर्ल्ड इंटरप्रेन्योरशिप फोरम थिंक टँकच्या सदस्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील कामाला अजित पवारांचा सक्रिय पाठिंबा असल्याचे वृत्त आहे. तसेच त्यांच्या प्रचाराचे वाहनसुद्धा या परिसरात फिरत आहे. ६० वर्षीय सुनेत्रा यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील राजकीय कुटुंबात झाला. त्या माजी राज्यमंत्री आणि लोकसभेचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत, जे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. पाटील यांनी १९९९ मध्ये पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपाचे आमदार आहेत. सुनेत्रा यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढविली नाही, परंतु त्या राज्याच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून पतीच्या प्रचारात सक्रिय राहिल्या आहेत.

Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

शुक्रवारी बारामतीत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित म्हणाले की, मी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार जाहीर करणार आहे, कारण आम्हाला मतदारसंघातील विकासकामे वेगाने करण्यासाठी सत्ताधारी आघाडीचा भाग व्हायचे आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राममंदिर उभारून देशभरात विकासकामे केली, त्यावरून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना सांगा की, माझा उमेदवार खासदार (सुळे) पेक्षा जास्त काम करेल, असंही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.

पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, सुनेत्रा यांचा मोठा मुलगा पार्थ पवार याला २०१९ मध्ये मावळमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली होती. पार्थची उमेदवारी हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाचा मुद्दा होता, ज्यामुळे काका-पुतण्यांमध्ये भांडण झाले होते. पवारांनी शर्यतीतून माघार घेतल्याने पार्थला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण त्यांच्या कुटुंबातील दोनपेक्षा जास्त सदस्यांनी निवडणूक लढवू नये, असे पवारांचे मत असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी पार्थ यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला.

सुनेत्रा या राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या आकस्मिक शपथविधीमध्येही त्यांची भूमिका होती. काही दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर पवारांनी पक्षातील फूट थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, गेल्या जुलैमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली आणि अजित पवार पक्षाच्या अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि शिवसेनेच्या सत्ताधारी युतीमध्ये सामील झाले. खरं तर अजित पवार यांना त्यांचे समर्थक दादा किंवा भाऊ म्हणून संबोधतात, तर सुनेत्रा पवार यांना वहिनी म्हणून हाक मारली जाते.

बारामती हा शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला

बारामती लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे. सुळे यांच्या विरोधात आपला उमेदवार विजयी झाला तरच आपण बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगून मतदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

बारामती मतदारसंघ आणि पवार घराण्याचे नाते

शरद पवार यांनी १९६७, १९७२, १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये बारामतीतून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली होती आणि १९८४, १९९६, १९९९ आणि २००४ मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली होती. याशिवाय २००९ मध्ये त्यांनी माढा आणि त्यांचे गृहराज्य महाराष्ट्रातून राज्यसभेच्या दोन निवडणुका जिंकल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुप्रिया सुळे यांनी गेल्या तीन वेळा केले आहे. अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि नंतर १९९१, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सात वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या.