हर्षद कशाळकर

अलिबाग- अदिती तटकरेंमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला होता. त्यांचाच मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेना आमदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे.रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच हवा, अदिती तटकरे नको अशी मागणी आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे या तिघांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण त्यांनी ही मागणी मान्य न केल्याने शिवसेनेचे तीनही आमदार शिंदे गटाने केलेल्या उठावात सहभागी झाले होते.

Satej Patil, Sanjay Mandalik,
उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

सत्तेत सहभागी असूनही आदिती तटकरे या शिवसेना आमदारांचे ऐकत नाहीत, शिवसेना आमदारांना जिल्हा नियोजन विकास निधी पुरेशा प्रमाणात देत नाहीत. आमदारांच्या मतदारसंघातील कामांचे श्रेय स्वतः घेतात. असा आरोप या तिन्ही आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केला होता. त्यामुळेच शिवसेना आमदारांच्या उठावात या तीनही आमदारांनी प्रमुख भूमिका बजावली होती.आता त्याचा अदिती तटकरेंचा कॅबिनेट मंत्री मंडळात सहभाग झाल्याने, शिंदे शिंदे गटातील शिवसेना आमदारांची मोठी पंचाईत झाली आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळासह तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद दिले गेले तर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे त्यामुळे हे तीनही आमदार आणि ती तटकरेंशी कसे जुळवून घेणार हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>आरोप केलेले बहुसंख्य नेते भाजपबरोबर आल्याने किरीट सोमय्या यांची पंचाईत   

भरत गोगावले मंत्रीपदाच्या प्रतीक्षेतच

राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना वेटिंग वर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळू शकलेले नाही त्यामुळे गोगावले पुन्हा एकदा मंत्री पदाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत… लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असा आशावाद त्यांनी जाहीर पणे व्यक्त केला आहे. यावरून मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्ष नेते असलेल्या अजित पवार यांनी त्यांना कोपरखळ्या ही लगवलेल्या होत्या. ‘गोगावलेंच्या कोटाला उंदीर लागण्यापूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करा आणि मला बोलवा’ असा टोमणा मारला होता. आता अजित पवार आणि अदिती तटकरे दोघेही मंत्रिमंडळात दाखल झाल्याने गोगावले यांची मोठीच अडचण झाली आहे.