लातूर : निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, लातुरातील देशमुख कुटुंबीय मन लावून प्रचारात उतरतात. यावेळची लोकसभेची निवडणूक देशमुख कुटुंबीयांनी अगदी मनावर घेतली आहे. लातूर शहरचे आमदार अमित देशमुख व ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे दोघेजण आपापल्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीत गुंतलेले आहेत. अमित देशमुख हे स्टार प्रचारक असल्याने लातूरबरोबरच नांदेड, सोलापूर, पंढरपूर, धाराशिव व संभाजीनगर या ठिकाणी ते आत्तापर्यंत निवडणूक प्रचारात जाऊन आले. ते लातूर लोकसभा निवडणूक प्रमुख असल्याने लातूरच्या जिल्हाअंतर्गत विधानसभा मतदारसंघातही सतत संपर्कात आहेत. लातूर शहरात कोपरा सभा घेण्यापासून एखाद्याच्या दुकानातही जाऊन ते पंधरा-वीस जणांच्या बैठकीत बोलत आहेत. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे. त्यामुळेच या निवडणुकीत अंग झटकून ते कामाला लागल्याची चर्चा मतदारसंघात होते आहे.

लातूर शहर व ग्रामीण या दोन मतदारसंघात संघांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात ते फारसे लक्ष घालत नव्हते. उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद असल्यामुळे ते काही प्रमाणात उदगीरमध्ये लक्ष घालत होते. मात्र, अहमदपूर व निलंगा या मतदारसंघात काँग्रेस क्षीण असल्याने ते या निवडणुकीत पहिल्यांदाच या दोन्ही मतदारसंघातही लक्ष घालत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यावर पकड निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख व नंतर दिलीपराव देशमुख संपूर्ण जिल्ह्यात एकहाती प्रचार यंत्रणा राबवत होते. त्याच पद्धतीने अमित देशमुख यांनी जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…”
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…

हेही वाचा – “नेहरू, इंदिरा मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती

विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर तालुका वगळता अन्य विधानसभा मतदारसंघातही प्रचारासाठी जात आहेत. रेणापूर येथे महिला मेळावा त्यांनी घेतला व निलंगा येथे त्या महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या होत्या. मेळाव्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाताई यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची आवर्जून भेट घेतली. निलंग्यात वैशालीताई देशमुख या पहिल्यांदाच गेल्या होत्या.

वैशालीताई देशमुख ज्याअर्थी लातूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत लक्ष घालत आहेत त्याअर्थी देशमुख कुटुंबीयांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे देशमुख यांनी यावेळी कोणताच धोका पत्करायचा नाही, हे लक्षात घेऊन निवडणूक प्रचारात ते फिरत आहेत. आणखी रितेश देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. कदाचित शेवटच्या टप्प्यात त्यांचा रोड शो होऊ शकतो.

हेही वाचा – केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

डॉ. शिवाजी काळगे हे राजकारणात नवे आहेत. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांचे वडील बंडप्पा काळगे हे ८७ वर्षांचे असून ते जुने शेकापचे कार्यकर्ते, निलंगा तालुक्याचे ते काही काळ अध्यक्ष होते. ते या निवडणुकीत सक्रिय असून जुन्या काळातील शेकापची मंडळीही त्यांच्या समवेत प्रचारात आहेत. डॉ. काळगे यांच्या पत्नी सविता काळगे या प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्याही या निवडणुकीत प्रचारात आहेत.