मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या नागपूरमधील मतदारसंघात जनसंपर्क आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पत्नी अमृता यांची साथ लाभणार आहे. त्यांनी दर महिन्याला किमान चार दिवस मतदारसंघासाठी द्यावेत, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असून आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. फडणवीस हे महिन्यातून दोन-चार वेळा नागपूरला आणि आपल्या मतदारसंघातही जातात. जनसंपर्क साधून नागरिकांची कामे करणे, भेटीगाठी व निवडणूक तयारीची कामे पाहतात. त्यांचे विश्वासू सहकारी व भाजप पदाधिकारी हे मतदारसंघाची जबाबदारी सांभाळतात.

jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला
Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
friendly fight nashik
नाशिकमध्येही मैत्रीपूर्ण लढत करावी – काँग्रेसची मागणी

हेही वाचा… माढाच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत संघर्ष मोहिते-पाटील यांचाही दावा

पण आता निवडणुका जवळ आल्याने आणि फडणवीस हे राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक प्रचार व अन्य कामांत अधिक व्यस्त राहतील. त्यांना मतदारसंघाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी दर महिन्याला किमान चार दिवस असे चाळीस दिवस निवडणूक तयारीसाठी द्यावेत, अशी विनंती भाजप नेत्यांनी त्यांना केली आहे. त्यादृष्टीने त्यांचा कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याने ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.

हेही वाचा… ‘इंडिया’ आघाडीत प्रागतिक आघाडीचा तीन जागांवर दावा

अमृता फडणवीस या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील, जनसंपर्क साधून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत करतील, मतदारनोंदणी व अन्य निवडणूक तयारीच्या कामातही सहभागी होतील, असे संबंधितांनी नमूद केले.