निलेश पवार

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख आमश्या फुलजी पाडवी यांचे नाव पुढे आल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावणे साहजिक आहे. कोण हा आमश्या पाडवी? असा प्रश्न अनेकांना पडला. सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे आमश्या पाडवी आता थेट विधान भवनात पोहचणार असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

Shindesena, thane,
शिंदेसेनेचे ठाण्यात पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

२०१४ मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी चढती कमान राहिली आहे. काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवींकडे पाहिले जाते. अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पाडवी १९९८ पासून २०१९ पर्यत २१ वर्षे अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. २००१ ते २००८ या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

२०१४ मध्ये पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याकडे शहादा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांमध्ये शिवसेना वाढविण्याचे काम सोपविण्यात आले. जिल्हाप्रमुख असलेल्या पाडवी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुका लढविल्या. विधानसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांचा अवघ्या दोन हजार ९६ मतांनी पराभव झाला. भाजप उमेदवाराने केलेल्या बंडखोरीमुळे त्यांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून आमश्या पाडवी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नजरेत भरले.

देशात रिसॉर्ट राजकारणाचे वारे, जनता तप्त आणि आमदार स्विमिंग पूलमध्ये व्यस्त

जिल्ह्यात सध्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे राजकीय बळ शिवसेनेला लाभले आहे. त्यामुळे कधी नव्हे ते शिवसेनेने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. परंतु, जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेचे सर्वच मतदारसंघ हे आदिवासी राखीव असल्याने तश्या चेहऱ्याला पाठबळ देण्यासाठीच आमश्या पाडवींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे म्हटले जाते. विधान परिषदेसाठी राज्यपालांच्या होकाराअभावी ज्या नियुक्त्या रखडल्या आहेत, त्या यादीत रघुवंशी यांचेही नाव आहे. त्यांचे नाव कायम असतानातच जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी दुसरे नाव पुढे आले आहे.

पहिल्यांदाच आदिवासी बहुल भागातील आदिवासी आणि जमिनीवरच्या नेत्याला थेट विधान परिषदेसाठी संधी मिळाल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत. शिवसेनेने आमश्या पाडवी यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सोडलेला हा बाण त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला की विरोधी भाजप अथवा सेनेअंतर्गत काही बड्या नेत्यांना घायाळ करतो हे येणारा काळच ठरवेल.