केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ५४ मते मिळवून त्यांनी बहुमत सिद्ध केले आहे. सभागृहाचे कामकाज सोमवार १९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यावरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्हाला अटक होऊ शकते, पण आमच्या विचारांना अटक होऊ शकत नाही. दिल्लीतील प्रस्तावाला माझा पाठिंबा आहे, असंही केजरीवालांनी सांगितलं.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चेदरम्यान म्हणाले की, दिल्लीतील रुग्णालयात औषध बंद करण्याचे काम भाजपाने केले. दिल्लीची जनता भाजपाच्या पापांची खातरजमा करेल. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये स्लिप बनवणाऱ्यांना काढून टाकण्यात आले. दिल्लीत फरिश्ते योजना बंद करण्यात आली, त्याद्वारे २३ हजार लोकांना मोफत उपचार मिळत होते. केजरीवालांच्या पक्षातील सात आमदारांना भाजपामध्ये जाण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. दिल्लीतील भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा फसल्याचंही केजरीवालांना सांगितले. आमच्या कोणत्याही आमदाराने पक्षांतर केलेले नसल्याचंही केजरीवालांनी अधोरेखित केलेय. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आपचे ६२ आमदार आहेत. शनिवारी सभागृहात उपस्थित असलेल्या आपच्या ५४ आमदारांनी केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शुक्रवारी सभागृहातील भाजपच्या सात आमदारांना निलंबित करण्यात आले. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान सभागृहातील भाजपा आमदार रामवीर सिंग बिधुरी हे विरोधी पक्षनेते म्हणून उपस्थित होते.

Magathane, uddhav thackeray group,
मुंबई : मागाठाण्यात ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेविका शिंदे शिवसेनेत
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
Kalyan East Assembly Constituency BJP aspirant Narendra Pawar from Kalyan Paschim is likely to get candidature print politics news
कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’?
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब
Shivsena, claim, Murbad Constituency,
शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
Political discussion with Abdul Sattar Nagesh Patil Ashtikar visit to Mumbai
सत्तार, अष्टीकर आणि बांगर भेटीने चर्चेला उधाण

मी माझा शिपाईदेखील बदलू शकत नाही : केजरीवाल

ते पुढे म्हणाले की, मला वाईट वाटते. आमचे दिल्ली सरकार आहे. पण आमच्याकडे सेवा विभाग नाही. मी माझ्या शिपाईदेखील बदलू शकत नाही. ते अधिकाऱ्यांना काम न करणाऱ्या धमक्या देत आहेत. त्यांचे ऐकले नाही तर ईडी मागे लावू असे सांगत आहेत. सामान्य अधिकारी आणि आयएएस अधिकारी माझ्याकडे येऊन रडत आहेत. ते आम्हाला का फोडू शकत नाहीत? कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. ते आम्हाला चिरडण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

संपूर्ण दिल्लीत पाणी आणि गटारांची समस्या आहे. दिल्ली सरकारने ५ हजार रुपयांचे बजेट दिले. मात्र वित्त विभाग अंदाजपत्रक देत नाही. प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, न्यायालयाने बजेट देण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप दिलेले नाही. चुकीची पाण्याची बिले येत आहेत. आम्ही प्रस्ताव मंजूर केला. पण ते तसे होऊ देत नाहीत. करोडो लोकांचे आपल्यावर प्रेम आहे. दिल्लीतील शाळांमध्ये १८ लाख मुले शिकतात. सरकारी रुग्णालयात लाखो लोकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे काम आहे. लोकांच्या प्रार्थना आमच्या पाठीशी आहेत. केजरीवाल यांना तुरुंगात टाकता येईल. पण आमच्या विचारांना तुरुंगात टाकता येणार नाही, असं म्हणतही केजरीवालांनी भाजपावर पलटवार केला.

हेही वाचाः तेलंगणात काँग्रेसचे ‘मिशन लोकसभा’, लोकांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा पाऊस!

आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी भाजपाला कोंडीत पकडले

विधानसभेत चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी म्हणाले की, भाजपा दारू घोटाळ्याचे नाव घेऊन आम आदमी पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीतील लोकांना मोफत बस सेवा, मोफत वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, हे सर्व सरकारच्या चांगल्या कामांमुळे घडले आहे, दिल्ली सरकारच्या तिजोरीत सातत्याने महसूल येत आहे, ज्याच्या मदतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकार या सर्व सुविधा पुरवत आहे. मात्र भाजपाला ही सर्व कामे थांबवायची आहेत, त्यामुळेच दिल्ली सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपले आमदार विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण एकही आमदार फुटायला तयार नाही. सर्वजण पूर्ण ताकदीने केजरीवाल यांच्याबरोबर आहेत.

हेही वाचाः महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!

विश्वासदर्शक ठराव आणण्याची गरज नव्हती : रामवीर सिंह बिधुरी

विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, विश्वासदर्शक ठराव आणण्याची गरज नाही. केजरीवाल सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. दिल्लीतील जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी आमदारांच्या खरेदीबाबत आरोप केला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र आता ते तपासात मदत करीत नाहीत. दिल्लीत दारू घोटाळा झाला. या प्रकरणी दिल्लीचे दोन मंत्री आणि एक खासदार तुरुंगात आहेत. या प्रकरणात कमिशन लक्षणीय वाढले होते. निवासी भागात दारूची दुकाने सुरू झाली.

पुढे म्हणाले की, हे दारू धोरण चांगले असल्याचा आरोप केला जात आहे, मग ते का मागे घेतले. दिल्ली जल बोर्डही घोटाळ्यात अडकले. यापूर्वी ते ६०० कोटी रुपयांच्या नफ्यात होते. आता तोट्यात आहे. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडावी. पाण्याचे बिल भरण्यासाठी ज्या एजन्सीला नियुक्त केले होते, त्याचे कमिशन वाढले होते. दिल्लीत वीज घोटाळा झाला. दिल्लीत वीज कंपनीला अधिक कमिशन मिळाले. त्यांना आठ हजार कोटी रुपये देण्यात आले. याची चौकशी सुरू आहे.

केजरीवाल म्हणाले, छापा टाकला, पण काही सापडले नाही

केजरीवाल पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया, संजय सिंह, जैन यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले, पण काहीही मिळाले नाही. लोकांचे प्रेम हीच आमची संपत्ती आहे. देशात दोन सरकारे आहेत. केंद्र सरकार आहे, ज्याने कोणतेही काम केले नाही. तर दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाले, ज्याने खूप काम केले आहे.

दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला

आप आमदारांच्या घोडेबाजाराचे आरोप आणि अबकारी धोरणात ईडीचे समन्स या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी शनिवारी या प्रस्तावावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव मांडताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, विविध राज्यात पक्ष फोडले जात आहेत आणि खोट्या प्रकरणात अडकवून सरकार पाडले जात आहे.

आता काय होणार?

खरं तर हा विश्वासदर्शक प्रस्ताव केवळ सभागृहातील ताकद दाखवण्यासाठी नव्हता, तर मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) केजरीवालांना अटक केली जाण्याची शक्यता असताना राजकीय संकेत देण्याचा ही होता. केजरीवाल यांनी आतापर्यंत ईडीने जारी केलेले पाच समन्स वगळले आहेत. ईडीचे समन्स वगळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आरोपी किंवा साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात आले होते का हा प्रश्न होता. ईडीने समन्सचे पालन न केल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. विधानसभेचे सत्र सुरू असल्यामुळे ते प्रत्यक्ष हजर राहू शकले नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १६ मार्चपर्यंत ठेवली आहे. ईडीने या आठवड्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले असून, त्यांना १९ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. आता पुढील आठवड्यात ते ईडीसमोर हजर राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.