प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुख्य भूमिकेतील ‘पठाण’ चित्रपटाचं गाणं प्रदर्शित झाल्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतले. तसेच देशभरात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला. देशात अनेक ठिकाणी या चित्रपटाच्याविरोधात पोस्टर-बॅनर फाडण्यात आले, तोडफोड करण्यात आली. मात्र, आता गुजरातमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) चित्रपटाला विरोध करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हिंदुत्ववादी संघटनांकडून अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले. या बदलांनंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आता ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करणार नसल्याचं म्हटलं.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

गुजरात विहिंपचे अशोक रावल म्हणाले, “बजरंग दलाने पठाण चित्रपटाविरुद्ध केलेल्या आंदोलनानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून अश्लील गाणे आणि अश्लील शब्द काढून टाकले आहेत. ही चांगली बातमी आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी यशस्वी लढा दिल्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आणि संपूर्ण हिंदू समाजाचे अभिनंदन करतो.”

‘पठाण’ चित्रपटात नेमके काय बदल?

हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) ‘बेशरम रंग’ या गाण्यातील काही दृश्ये काढण्यास सांगितले. या चित्रपटात एकूण १० पेक्षा जास्त ठिकाणी ‘कट’ सुचवण्यात आले. असं असलं तरी हिंदुत्ववादी संघटनांनी बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या ज्या बिकिनीवर आक्षेप घेतला होता तो मात्र मान्य केला नाही. बोर्डाने दीपिकाची बहुचर्चित भगवी बिकिनी चित्रपटाचा भाग म्हणून कायम ठेवली.

याशिवाय चित्रपटातील ‘लंगडे लुल्ले’ या शब्दप्रयोगाऐवजी ‘टुटे फुटे’ असा शब्दप्रयोग बदलण्यात आला. अशोक चक्र ऐवजी वीर पुरस्कार, केजीबी (KGB) ऐवजी एसबीयू (SBU) आणि श्रीमती भारतमाता ऐवजी हमारी भारतमाता असे बदलही सुचवण्यात आले.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या एक मिलियनपेक्षा जास्त तिकिटांची विक्री; प्रदर्शनाआधीच कमावले ‘इतके’ कोटी

पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं करत चित्रपटाचे पोस्टर आणि बॅनर जाळले. आता विरोध मावळल्यावर गुजरात विश्व हिंदू परिषदेचे नेत्यांनी हा चित्रपट पाहायचा की नाही हे आम्ही गुजरातच्या सुबुद्ध नागरिकांवर सोडतो, असं म्हटलं आहे.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये विरोध कायम

दरम्यान, मध्य प्रदेशातील रतलाममध्ये बजरंग दल आणि हिंदू जागरण मंचच्या सदस्यांनी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि थिएटर मालक यांच्यातील बैठक अपयशी ठरली आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये, विश्व हिंदु परिषद आणि बजरंद दलाने आधी आम्ही हा चित्रपट पाहू आणि त्यानंतरच तो लोकांसाठी खुला केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : “आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही, त्यांचा…”, राज ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

उत्तर प्रदेशामध्ये आग्रा येथे अखिल भारत हिंदू महासभेने चित्रपटाला विरोध करणारे पोस्टर लावले आहेत. कोणत्याही सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित करू देणार नाहीत, असा इशारा या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.