आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (TDP) सस्थापक एन. टी. रामा राव यांची कन्या आणि टीडीपी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची पत्नी नारा भुवनेश्वरी यांनी आजवर स्वतःला जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर ठेवले होते. नायडू यांच्या कुटुंबाची खासगी कपंनी असलेल्या हेरिटेज फुड्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळण्याखेरीज दुसरे कोणतेही सर्वजनिक जीवनातील पद त्या सांभाळत नाहीत. पण चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास मंडळ घोटाळ्यात अटक केल्यानंतर भुवनेश्वरी तेलगू देसम पक्षाच्या आंदोलनात उतरल्या. भुवनेश्वरी यांनी बुधवारी (दि. २५ ऑक्टोबर) तिरुपती बालाजी येथून ‘निजम गेलावली यात्रे’ची (सत्याचा विजय होणारच) सुरुवात केली.

नायडू यांना अटक केल्यानंतर धक्का बसल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. या यात्रेच्या माध्यमातून भुवनेश्वरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना जाऊन भेटणार आहेत. तेलगू देसम पक्षाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष किंजरापु अचनैडु यांनी यात्रेबद्दल बोलताना सांगितले की, यात्रेला मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि यामाध्यमातून भुवनेश्वरी यांना लोकांशी संपर्क प्रस्थापित करता येईल.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

हे वाचा >> ‘चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई’; राजमहेंद्रवरम कारागृहात रवानगी

टीडीपी कार्यकर्त्यांमध्ये भुवनेश्वरी या मितभाषी असल्याचे मानले जाते. चंद्राबाबू नायडू यांच्यासह फार कमी वेळा त्या सार्वजनिक मंचावर दिसल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्या बातम्यात आल्या होत्या. विधानसभेत घमासान वादविवाद सुरु असताना वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नायडू यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टिप्पणी केली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नायडू यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभेत प्रतिमा मलिन केल्याबद्दल मी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांना १५ सप्टेंबर रोजी अटक केल्यानंतर भुवनेश्वरी बऱ्याच काळानंतर लोकांमध्ये दिसल्या होत्या. राजमहेंद्रवरम केंद्रीय कारागृहात जाऊन नायडू यांची भेट घेतल्यानंतर भुवनेश्वरी यांनी काही माध्यमांशी संवाद साधला होता. “तुरुंगात माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे. तुरुंगात वाईट परिस्थिती असल्यामुळे त्यांचे पाच किलो वजन कमी झाले आहे आणि त्यांचे आणखी वजन कमी झाले तर त्यांच्या मूत्रपिंडाला त्रास होऊ शकतो. त्यांना त्वचारोग आहे आणि तुरुंगातील उष्ण आणि दमट स्थितीमुळे त्यात वाढ होत चालली आहे”, अशी माहिती भुवनेश्वरी यांनी दिली.

भुवनेश्वरी त्यांच्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोमवारी (२३ ऑक्टोबर) म्हणजे, यात्रा सुरू करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, त्या पहिल्यांदाच त्यांचे पती चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय तिरुमाला मंदिरात जाणार आहेत. “मी याठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्यांसह नेहमी येत होती. यावेळची भेट एकटीने घ्यावी लागत असल्यामुळे थोडी दुःखी आहे”, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली.

आणखी वाचा >> अन्वयार्थ : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर तेलुगू देशम?

बुधवारी (२५ ऑक्टोबर) त्यांनी महिला समर्थकांसह काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यावेळी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, या आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही मला जो पाठिंबा दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा फक्त न्याय मिळविण्याचा लढा नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे आखून दिलेली तत्त्वे जपण्याचा संघर्ष आहे. हा लढा आपल्या भविष्यासाठी आहे. महिलांची सुरक्षितता, आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करणे आणि पुढच्या पिढ्यांना चांगले भविष्य देण्यासाठीचा हा लढा आहे. या विषयासाठी तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत मी तुमच्या प्रत्येकाची ऋणी आहे. एकत्र संघर्ष करून आपण विजयी होऊ आणि शेवटी विजय हा न्यायाचा होईल.