scorecardresearch

Premium

‘चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई’; राजमहेंद्रवरम कारागृहात रवानगी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांना भ्रष्टाचाराबद्दल धारेवर धरल्यानेच चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, असा आरोप तेलुगु देशमचे नेते केसनी चिन्नी यांनी केला आहे.

chandrababu naidu arrest
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

पीटीआय, विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांना भ्रष्टाचाराबद्दल धारेवर धरल्यानेच चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, असा आरोप तेलुगु देशमचे नेते केसनी चिन्नी यांनी केला आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस जनतेचे पैसे लुटत आहे. अशावेळी त्यांना प्रश्न विचारल्यानेच कारवाई करण्यात आली अशी टीका तेलुगु देशमच्या नेत्यांनी केली आहे.

आंध्र प्रदेशच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची टीकाही पक्षाने केली आहे. नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ हैदराबाद येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी आंध्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याखेरीज सोमवारी आंध्रमध्ये ठिकठिकाणी तेलुगु देशमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. चित्तूर जिल्ह्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली.  आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून अटकेचा निषेध केला.

several maha vikas aghadi leaders accused of corruption today they are part of bjp government
 ‘ते’ तेव्हा तिथे..आता इथे!
What Devendra Fadnavis Said?
उद्धव ठाकरेंच्या ‘मनोरुग्ण’ टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या डोक्यावर…”
narendra modi
ऐक्याच्या संदेशासाठी धर्मगुरू संसदेत मोदींच्या भेटीला!
CM Mohan Yadav MP government change
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ते मंत्र्यांसाठी विशेष शिकवणी; मोहन यादव MP सरकार कसे चालवतायत?

राजमहेंद्रवरम कारागृहात रवानगी

राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश) : तेलुगु देशमचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांना येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. कोटय़वधी रुपयांच्या कौशल्य विकास महामंडळ घोटाळाप्रकरणी विजयवाडा न्यायालयाने ७३ वर्षीय चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने नायडू यांना घरचे जेवण तसेच विशेष खोली देण्यास अनुमती दिली आहे. चंद्राबाबू यांच्यासमवेत त्यांचे पुत्र नारा लोकेश हे कारागृहापर्यंत होते. नायडू यांच्यावरील आरोप पाहता त्याची २४ तासांत चौकशी पूर्ण करणे कठीण असल्याचे आदेशात म्हटले आहे. शनिवारी पहाटे नायडू यांना अटक करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Formar chief minister chandrababu naidu accused of taking revengeful action ysh

First published on: 12-09-2023 at 00:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×