राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणीत केल्यावर चव्हाण यांच्या मतांची आम्ही गांभीर्याने नोंद घेत नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने या दोन नेत्यांमधील संबंध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये शरद पवार विरोधी एक गट सुरुवातीपासूनच कायर्रत आहे. पवार काँग्रेसमध्ये असताना दिल्लीतून या नेत्यांना बळ दिले जात असे. पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यावरही काँग्रेसमधील एक गट कायमच पवारांच्या विरोधात राहिला आहे. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, अशी आग्रही भूमिका या गटाने सातत्याने मांडली आहे. यात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

dispute between mahayuti is not solved in Nandurbar Shinde group still away from campaigning
नंदुरबारमध्ये महायुतीतील वाद मिटेनात, शिंदे गट अजूनही प्रचारापासून दूर
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

हेही वाचा – karnataka election 2023 खेळण्यांच्या गावात पडणारे फासे ठरवणार कर्नाटकचा मुख्यमंत्री!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निपाणीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट राष्ट्रवादीवर आरोप केले. राष्ट्रवादीची भाजपबरोबर बोलणी सुरू आहे आणि पक्षाच्या काही नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता. निपाणीत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला आहे. या उमेदवाराला राज्यातील राष्ट्रवादीकडून सारी मदत केली जात आहे. शरद पवार पुढील आठवड्यात निपाणीत प्रचारार्थ जाणार आहेत. यातूनच चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला होता.

चव्हाण यांच्या आरोपांवर बोलताना शरद पवार यांनी काही जणांची मते पक्की असतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काही जण विरोधी मत व्यक्त करीत आहेत व त्यात चव्हाण यांचा समावेश आहे. आम्ही या मतांची गांभीर्याने नोंद घेत नाही आणि जनताही ती गांभीर्याने घेत नसावी, असे प्रत्युत्तर दिले. यातून पृथ्वीराज चव्हाण यांना फारशी किंमत देत नाही हेच शरद पवार यांनी अधोररेखित केले.

हेही वाचा – सार्वजनिक महामंडळांचा फायदा किती की राजकीय सोय?

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन नेत्यांमध्ये कधीच सख्य नव्हते. चव्हाण मुख्यमंत्री असताना पवार यांनी यांच्या हाताला लकवा लागला आहे की काय, असा मर्मीघाव घातला होता. तर चव्हाण यांनी नियमानुसारच कामे होतील, असे पवारांना प्रत्युत्तर दिले होते. यूपीए सरकारच्या काळात पवार आणि चव्हाण हे दोघेही मंत्री होते. तेव्हा पवारांच्या बाबत दिल्लीतील वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्यांमागे चव्हाण यांचाच हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पुन्हा उभयतांमधील संबंध उफाळून आले आहेत.