Karnataka elections 2023 गाव म्हणून प्रसिद्ध असलेले कर्नाटकातील चन्नपटना हे गाव या खेपेस ठरवणार कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कोण असणार, अशी चर्चा सध्या कर्नाटकात रंगली आहे. राजकारणात आलेल्या अभिनेता योगीश्वर यांनी या मतदारसंघावर गेली कैक वर्षे आपली छाप सोडली आहे. इथूनच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वतःची पत्नी अनिता हिलाही मतदारसंघातून उभे करून पाहिले, मात्र अपयशच हाती आले. अखेरीस २०१८ साली त्यांनी स्वतः धुरा हाती घेतली आणि हा मतदारसंघ स्वतःकडे राखला. आता पुन्हा एकदा कुमारस्वामी इथे उभे असून त्यांचा सामना योगीश्वर यांच्याशीच होणार आहे. जनता दल (एस)ने कुमारस्वामी यांचेच नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे केले आहे. मात्र या खेपेस ही लढत पूर्वी इतकी सोपी राहिलेली नाही. त्यामुळेच आता चेन्नापटना ठरवणार कर्नाटकचा भावी मुख्यमंत्री अशी चर्चा इथे रंगली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या खेपेस कुमारस्वामी यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. आता चेन्नपटना या एकाच मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहिलेला नाही.

आणखी वाचा : बाजार समित्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची ‘वज्रमूठ’

Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट
Amravati , ok sabha election 2024, Constituency Overview, navneet rana, bacchu kadu, BJP
मतदारसंघाचा आढावा : अमरावती; जनतेच्या न्यायालयातील लढाई नवनीत राणांसाठी अग्निदिव्य ठरणार
Vijayraj Shinde from Buldhana come to Nagpur to discuss with Chandrasekhar Bawankule
बुलढाण्यातील भाजप बंडखोर विजयराज शिंदेंना नागपुरात पाचारण; प्रदेशाध्यक्षांशी करणार चर्चा
Suresh Mhatre alleges that Union Minister Kapil Patil is involved in taking action on candidate godowns in Bhiwandi
भिवंडीतील उमेदवाराच्या गोदामांवर कारवाई ? केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा हात असल्याचा सुरेश म्हात्रे यांचा आरोप

चेन्नपटनामधील या लढतीला आणखी एक महत्त्वाचा कोन आहे तो म्हणजे बंगळुरू- म्हैसुरू एक्स्प्रेसवेचा. पूर्वी हे गाव बंगळुरू- म्हैसूर महामार्गावर होते. त्यामुळे प्रवाशांच्या गाड्या येत, थांबत, खेळणी विकली जात आणि मग प्रवासी पुढे जात असतं. आता नवा एक्स्प्रेसवे हा या गावात न येत थेट बाहेरूनच निघून जातो. साहजिकच त्यामुळे प्रवासीसंख्या खूपच कमी झाली आहे. परिणामी त्याचा परिणाम थेट खेळणीविक्रीवर झाला आहे.स्थानिकांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. यापूर्वी गेल्या दोन वर्षांत कोविडच्या महासाथीनेही गावकऱ्यांचे कंबरडेच मोडण्याचे काम केले. आणि आता त्या पाठोपाठ एक्स्प्रेसवेमुळे प्रवासी संख्या रोडावणे हे गावाच्या ‘खेळण्याचे गाव’ या परिचयावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आहे. या नव्या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकातील ही निवडणूक होते. या साऱ्याचा परिणाम या मतदारसंघातील मतदानावर होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आणखी वाचा : ‘अमित शाह सपशेल अपयशी, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,’ विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

आद्यम टॉइजमध्ये काम करणारा निखिल या संदर्भात सांगतो, “ बंगळुरू- म्हैसुरू एक्स्प्रेसवेचा खूपच मोठा फटका येथील खेळणी उद्योगाला बसला आहे. पण याचा या निवडणुकीवर काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. आणि इथली निवडणूक हीदेखील या खेपेस भाजपा विरुद्ध जेडी (एस) अशी होणारी नाही तर ती माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी विरुद्ध सी. पी. योगेश्वर अशीच होणार आहे , इथे पक्ष नगण्य ठरतात”
कर्नाटकातील अनेक महत्त्वपूर्ण लढतींमध्ये चेन्नपटनाचा समावेश होतो, साहजिकच इथे काय होणार याकडे सामान्यजनांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. यंदाची निवडणूक कुमारस्वामी यांच्यासाठी तेवढी सोपी नाही, असे तर अनेकांचे मत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये ‘कुटुंबाची मालमत्ता असलेला पक्ष’ असे म्हणत जेडी (एस)वर सडकून टीका केली. हा पक्ष म्हणजे काँग्रेसची टीम-बी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. एकूण दोन लाख, ३० हजार ३२७ मतदारसंख्या असून त्यातील १.१० लाख हे वोक्कलिगा समाजाचे आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या २९ हजारांच्या घरात तर मागासवर्गीय ४२ हजार तर आदिवासींची संख्या सुमारे १५ हजारांच्या घरात आहे. वोक्कलिगा समाजाची संख्या इथे अधिक दिसत असली तरी प्रत्यक्षात मागासवर्गीय आणि इतर जनजातींची संख्या एकत्र केली तर ती अधिक भरते. त्यामुळे इतर जनजाती आणि मुस्लिमांचा ओघ कुणाकडे यावर या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ठरेल, असे संकेत आहेत. कुमारस्वामी यांची पत्नी २०१३ मध्ये इथे पराभूत झालेली असली तरी प्रत्यक्षात कुमारस्वामी मात्र गेल्या खेपेस २०१८ साली मोठ्या मताधिक्क्याने इथून निवडून आले.
खेळणीनिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेन्नपटनाला कोविडचा प्रचंड मोठा फटका बसला. खेळण उद्योग बंद होणार की काय अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. कोविडची लाट ओसरू लागल्यानंतर या उद्योगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्याचे पुनरूज्जीवन चांगले होते आहे, असे वाटत असतानाच आता बंगळुरू- म्हैसुरू एक्स्प्रेसवेचे उद्घाटन झाले आणि पर्यटकसंख्या प्रचंड रोडावली. असे असे तरी आद्यमच्या निखिलला वाटते आहे की, हा मतदानासाठीचा मुद्दा असणार नाही तर खेळणी विक्रीवितरणात महत्त्वाची भूमिका असलेल्या हमीदच्या मते एक्स्प्रेसवेमुळे विक्रीला ५० टक्के फटका बसला आहे. पूर्वी आठवडाअखेरीस वीकेण्डस् च्या वेळेस विक्री ५० हजारांपर्यंत जायची. मात्र आता ती अवघ्या तीन ते पाच हजारांवर आली आहे. अर्थात याचा फारसा परिणाम मतदानावर होईल असे वाटत नाही कारण काँग्रेस किंवा जेडी (एस) कुणीही सत्तेत असते तरी एक्स्प्रेसवे झालाच असता. खेळणी विक्रेता असलेल्या रामप्पाच्या मते , “कुमारस्वामींना ही निवडणूक कठीण जाणार आहे. योगीश्वर जनतेच्या संपर्कात असतात आणि त्यांनी इथे कामेही केली आहेत. शिवाय गेले काही महिने ते मतदारसंघात सतत फिरत असून कदाचित ते कुमारस्वामींना निकालामध्ये चकीतही करू शकतात.”

आणखी वाचा : बिहारमधील जातीआधारित सर्वेक्षणाला कोर्टाचा ‘स्टे’! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राजकीय कोंडी?

जेडी (एस) कार्यकर्ता कृष्णेगौडा सांगतो, “कुमारस्वामी यांनी इथे खूप काम केलेले आह. नवीन शाळा, महाविद्यालये, डांबरी सडक आणि बरेच काही. मात्र त्यांनी प्रचारात या मुद्द्यांचा वापर फारसा केलेला नाही. असे असले तरी इथल्या मतदारांचे कुमारस्वामींच वडील देवेगौडा यांच्याशी विशेष नाते आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांना निवडणूक जड जाईल, असे बिलकुल वाटत नाही”

तुलनेने योगीश्वर यांची कारकीर्द रोचक आहे. भाजपाच्या नावाशिवायदेखील त्यांना एक वेगळे महत्त्व आहे. चेन्नपटनामधून तब्बल पाच वेळा ते निवडून आले आहेत. २०१३ साली समाजवादी पार्टीच्या तिकिटावर, २०११ च्या पोटनिवडणुकीत भाजपातर्फे, २००८ आणि २००४ साली काँग्रेसच्या तिकिटावर तर १९९९ साली अपक्ष म्हणून. त्यामुळे ते कुणाच्या तिकिटावर निवडणूक लढवतात, याला फारसे महत्त्व नाही. त्याचा स्वतःचा असा एक मतदार त्यांनी इथे निर्माण केला आहे. नेता म्हणून ते सुपरिचित आहेत. फक्त २०१८ साली त्यांनी कुमारस्वामी यांना पराभवाचा धक्का दिला. कुमारस्वामी सरकार खाली खेचण्यासाठी भाजपाने केलेल्या प्रयत्नांत योगीश्वर यांचा वाटा होता. ती चाल खेळून योगीश्वर यांनी कुमारस्वामींचा वचपा काढला, असे राजकीय विश्लेषक मानतात. “माझ्यामुळे नाही तर कुमरस्वामींच्या अक्षमतेमुळेच आमदारांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली आणि सरकार कोसळले,” असे योगीश्वर सांगतात. २०१८ च्या निवडणुकीमध्ये तब्बल २९ हजारांचा मुस्लिम समाज त्यांच्यापासून दुरावला त्याचा मोठा फटका योगीश्वर यांना बसला होता. त्यावेळेस योगीश्वर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

भाजपा कार्यकर्ता कृष्णैया सांगतात, “शहरी भागांतून गेल्या खेपेस योगीश्वर यांना चांगले मतदान झाले मात्र ग्रामीण भागांतून मतदान कमी झाले, त्याचाच फटका त्यांना बसला. त्यातच काँग्रेसचा उमेदवार लेचापेचा असल्याने मतदान कुमारस्वामी यांच्या पारड्यात पडले. मात्र या खेपेस योगीश्वर यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले असून ते नक्की निवडून येतील, असे वाटते आहे.” जेडी (एस)चा या मतदारसंघावर अनेक वर्षे डोळा आहे, मात्र सातत्याने त्यांना योगीश्वर यांच्याविरोधात पराभवाला सामोरे जावे लागले. अपवाद काय तो गेल्या खेपेस कुमारस्वामी निवडून आले तोच एकमात्र. पण तरीही याचा अर्थ इथे आता पुन्हा तेच निवडून येतील, असे नाही असे अनेक मतदारांना वाटते. म्हणूनच कदाचित आता जेडी (एस)ने भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मतदारसंघ असे सांगण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातून निवडून आलेला असावा, अशी भाविनक साद घालण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या कुमारस्वामी यांनी मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. तर ते राज्याच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. अखेरच्या टप्प्यात केवळ दोन मोठ्या जाहीर सभा घेतल्या तरी त्या पुरेशा असतील,असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे.
मात्र भाजपा कार्यकर्त्यांना वाटते की, “परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. गेल्या खेपेस त्यांनी [कुमारस्वामी यांनी] खूप मोठमोठी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात मतदारसंघात काहीच झालेले नागी. मतदारांना ते उपलब्धही नसतात. त्यामुळे लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्याउलट गेली २५ वर्षे योगीश्वर यांचे इथे काम आहे. शिवाय ते गेल्या खेपेस हरले हेही लोकांच्या मनाला लागले आहे, त्याचा चांगला परिणाम या खेपेस मतदानात पाहायला मिळेल.”
पलीकडच्या बाजूस काँग्रेसचे राज्य प्रमुख डी. के. शिवकुमार यांचे मेहुणे सीपी शरश्चंद्र यांना इथून निवडणूक लढविण्यात स्वारस्य होते. मात्र काँग्रेसने गंगाधर एस. यांना तिकीट दिले. त्यामुळे शरश्चंद्र यांनी ‘आप’कडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसचा उमेदवार फारसा प्रभाव पाडणारा नसल्याने कुमारस्वामी विरुद्ध योगीश्वर या लढतीत, काँग्रेस कुठेच नसेल, असे स्थानिकांना वाटते.