पीटीआय, नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलून प्रस्थापितविरोधी लाट थोपवण्याचा भाजपचा प्रयोग लागोपाठ दुसऱ्यांदा यशस्वी झाला आहे. उत्तराखंडपाठोपाठ गुजरातमध्येही मंत्रिमंडळ फेरबदलाचा पक्षाला फायदा झाला. हिमाचल प्रदेशात मात्र भाजपने हा प्रयोग केला नाही आणि तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपने विजय रुपानी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले. विशेष म्हणजे या फेरबदलात संपूर्ण मंत्रिमंडळच नवे देण्यात आले. वर्षांच्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये तर भाजपने निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले. त्यानंतरही सत्ता कायम राखण्यात पक्षाला यश आले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचा स्वत:चा पराभव झाला, मात्र पक्षाला आवश्यक बहुमत मिळाले. दोन्ही ठिकाणी प्रस्थापितविरोधी मते घटविण्यासाठी ही खेळी यशस्वी ठरल्याचे पक्षाच्या एका राष्ट्रीय नेत्याने मान्य केले. मुख्यमंत्री बदलण्याच्या धोरणावर काँग्रेसने टीका केली असली तरी जनतेची भावना समजून घेत आवश्यक ते बदल करण्याची आपली तयारी आहे, हा संदेश पक्षाने दिला. हिमाचल प्रदेशात हा प्रयोग केला असता तर कदाचित तिथेही सत्ता राखण्यात यश आले असते, असेही या नेत्याने म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp benefits chief minister change after uttarakhand experiment successful in gujarat ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST