२०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या मतदारसंघात आपली जागा गमवावी लागली त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपाचा प्रतिनिधी निवडून यावा यासाठी पक्षाकडून जोरदार वाटचाली सुरू झालेल्या आहेत. या अंतर्गत प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना अश्या मतदारसंघात आपली ताकद मजबूत करण्याच्या टार्गेट देण्यात आला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेल्या निवडक १४४ मतदारसंघांना केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीची पहिली फेरी जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांच्या मते भाजपा नेतृत्वाने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एक नवीन लक्ष्य ठेवले आहे प्रत्येक मंत्र्यांना पक्षाने बिंबावुन सांगितले आहे की “संघटन हे त्यांचे प्राधान्य असले पाहिजे. आणि संघटना मजबूत केल्याशिवाय पक्ष आपल्या यशाची पुनरावृत्ती करणार नाही”.
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी कठीण जागांसाठी निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या ६० टक्क्यांहून अधिक पक्ष जिंकू शकतो, असे नमूद करून, भाजप नेतृत्वाने आपल्या केंद्रीय मंत्र्यांना जास्तीत जास्त जागांवर निवडून आणण्याचे आव्हान केले आहे.
या मिशनमध्ये भाजपने दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमधील १४४ मतदारसंघ निवडले होते. या मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांनी किमान ४८ तास राहून लोकांना वारंवार भेट देऊन विजयाचा मार्ग सुनिश्चित करण्याचे काम देण्यात आले होते. मंत्र्यांनी या राज्यांमध्ये केंद्राद्वारे चालवलेले कार्यक्रम कसे राबवले जातात हे पाहणे, या योजना राबविण्याबाबत स्थानिक घटकांकडून अभिप्राय घेणे आणि अंमलबजावणी प्रक्रियेत त्यांच्यासमोरील आव्हाने शोधणे अपेक्षित होते.
सूत्रांच्या मते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिजेपीचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल संतोष यांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांच्या दौऱ्याचे अहवाल सादर करण्यात आले. या बैठकीत शाह म्हणाले की संघटना मजबूत असेल तरच पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ शकेल. “संघटना कमकुवत असेल तर पक्ष नसतो असे ते म्हणाले. १४४ मतदारसंघांची निवडण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या त्यांच्या मंत्रिमंडळाने मे महिन्यात झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. मोदींनी बुधवारी त्यांच्या मंत्रिमंडळाला दुसऱ्या फेरीच्या बैठकीसाठी बोलावले आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, एस जयशंकर पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, स्मृती इराणी, गजेंद्र सिंह शेखावत, अनुराग ठाकूर या केंद्रीय मंत्र्यांना १४४ मतदार संघात पाठवण्यात आले होते. १४४ मतदारसंघ – प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारसंघाची निवड करण्यात आली होती जिथे पक्षाला हवे तसे मिळवता आले नाही.