लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी नेतेमंडळींच्या एका पक्षातून दुसर्‍या पक्षात कोलांटउड्या सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून तर अगदी आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे. आतापर्यंत मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षातील (बसप) अनेक नेत्यांनी पक्षाच्या धोरणांना विरोध करीत किंवा योग्य पक्षनेतृत्व नसल्याचे सांगत अन्य पक्षात प्रवेश केला आहे. बसपमधील १० विद्यमान खासदारांपैकी आणखी एकाने पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

पंतप्रधान मोदींचे लक्ष्य साध्य करण्याची घेतली शपथ

उत्तर प्रदेशमधील लालगंज लोकसभा मतदारसंघातील बसपच्या खासदार संगीता आझाद (वय ४२) यांनी त्यांचे पती माजी आमदार आझाद अरी मर्दन यांच्यासह भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह निर्भया आणि हाथरस बलात्कारपीडितांच्या वकील व बसप प्रवक्त्या सीमा कुशवाह यांनीदेखील पक्षप्रवेश केला आहे. पक्षातील तीन नेत्यांनी भाजपाची वाट धरल्याने मायावतींना मोठा धक्का बसला आहे. बसपच्या या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मजबूत करण्याची आणि ४०० हून अधिक जागा जिंकून पंतप्रधान मोदींचे लक्ष्य साध्य करण्याची शपथ घेतली.

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
navneet rana amol mitkari
“महायुतीत मिठाचा खडा टाकताय?” मिटकरींचा नवनीत राणांच्या ‘त्या’ कृतीवर आक्षेप; संतप्त इशारा देत म्हणाले, “दोन दिवसांत…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगीता यांनी पतीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. आतापर्यंत संगीता यांच्यासह पक्षातील चार विद्यमान खासदारांनी पक्ष सोडला. संगीता या दलित चेहरा म्हणून ओळखल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्या भाजपाप्रवेशाने आगामी निवडणुकीच्या काळात पक्षाला सर्वांत जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

मायावतींची साथ सोडणारे नेते

संगीता यांचे पती, माजी आमदार आझाद अरी मर्दन २०१७ मध्ये बसपच्या तिकिटावर लालगंज विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. बसप सोडून गेलेल्या चार खासदारांमध्ये दोन मुस्लिम, एक ब्राह्मण व एका दलित नेत्याचा समावेश आहे. २०१९ मध्ये संगीता यांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या लालगंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तत्कालीन खासदार नीलम सोनकर यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या उमेदवार यादीत सोनकर यांना लालगंजमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी (सपा) आणि बसप यांची युती होती. या निवडणुकीत बसपने १० जागा जिंकल्या होत्या; तर सपाला केवळ पाच जागा जिंकता आल्या होत्या. त्यात आंबेडकर नगरचे विद्यमान खासदार रितेश पांडे यांनी भाजपाचे मुकुट बिहारी यांना एक लाख मतांनी पराभूत केले होते. रितेश पांडे यांनीही गेल्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. यंदाही ते जागेवरून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. भाजपाच्या मनोज सिन्हा यांचा पराभव करणारे बसपचे गाझीपूरचे विद्यमान खासदार अफजल अन्सारी यांनी गेल्या महिन्यात सपामध्ये प्रवेश केला. सपादेखील त्यांना गाझीपूरमधून उमेदवारी देत ​​आहेत.

अमरोहाचे बसप खासदार दानिश अली यांनी भाजपाच्या कंवर सिंह तन्वर यांचा पराभव केला होता. त्यांना डिसेंबरमध्ये बसपने पक्षातून निलंबित केले होते. कारण- ते कॅश फॉर क्वेरी या प्रकरणात तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या बाजूने बोलले होते. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडेच ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सामील झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. सपासोबतच्या युतीचा भाग म्हणून काँग्रेस त्यांना अमरोहा येथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

संगीता आझाद यांची प्रतिक्रिया

बसपमधून बाहेर पडण्याबद्दल ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना संगीता म्हणाल्या की, पक्षाला योग्य नेतृत्वाची गरज आहे. माझा पक्ष किंवा त्यांच्या पक्षनेतृत्वाशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. परंतु, बहेनजी (पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती) यांच्यापर्यंत सामान्यांना पोहोचणे शक्य होत नाही; तर आकाश आनंद (मायावती यांचे पुतणे) यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. जे पक्षाला कुठे ना कुठे खटकत आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीतील जागावाटपाचा गोंधळ कायम, पश्चिम बंगालमधील नेत्यांची नाराजी

“मला खात्री आहे की, ही दरी भविष्यात भरून निघेल; पण यास वेळ लागेल. त्यामुळे आमचे आणि आमच्या मतदारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या धोरणांचा दलित आणि वंचित घटकांना फायदा झाला आहे,” असेही त्या म्हणाल्या.