महेश सरलष्कर

काँग्रेसच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सातत्याने प्रश्न विचारला गेला की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचे फासे अधिक घट्ट केल्यामुळे काँग्रेस आंदालन करत आहे का?, त्यावर, राहुल गांधी यांनी उत्तर देणे टाळले! पण, रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याशिवाय, ‘ईडी’चे जाळे तोडता येणार नाही, हे काँग्रेसलाच नव्हे तर, अन्य विरोधी पक्षांनाही लक्षात आल्याने गेले दोन आठवडे संसदेत आणि आता संसदेच्या बाहेर थेट भाजपला भिडण्याचे काँग्रेसने ठरवल्याचे दिसते.

hatkanangale lok sabha constituency marathi news,
मतदारसंघाचा आढावा : हातकणंगले; पंचरंगी लढतीत कमालीची चुरस
Loksatta chavdi happening in Maharashtra politic news on Maharashtra politics
चावडी: पंकजाताईंचे राजकीय वजन एवढे वाढले?
Loksabha Election 2024 Goa Congress Viriato Fernandes BJP Constitution Narendra Modi
गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड
Loksabha Election 2024 Kerala Congress Left fight in Kerala BJP
“तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका

काँग्रेसचे मुखपत्र ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘ईडी’ने चौकशी केली आहे. सोनिया आणि राहुल संचालक असलेल्या ‘यंग इंडियन’ यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे ‘यंग इंडियन’ कंपनीचे पदाधिकारी असल्याने गुरुवारी त्यांना ‘ईडी’ने नोटीस बजावून आठ तास चौकशी केली. राज्यसभेत ‘ईडी’च्या नोटिशीचा निषेध करून साडेबारा वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी खरगे निघून गेले. खरगेंच्या निवासस्थानी गुरूवारी संध्याकाळी साडेतास वाजता उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यासाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. पण, खरगे ‘ईडी’च्या चौकशीमध्ये अडकले होते.

हेही वाचा… प्रा. सावंत यांना पुन्हा मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा, तर राहुल मोटे यांची साखरपेरणी !

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर, शिवसेनेचे खासदारच नव्हे तर, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमूक, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष अशी सर्व विरोधी पक्षांची ‘ईडी’ चौकशीविरोधात एकजूट झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत सोनिया गांधी कधी नव्हे इतक्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या, त्या थेट लोकसभाध्यक्षांच्या मोकळ्या जागेत उतरून निदर्शने करत होत्या. पण, यावेळेला काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पूर्वी केलेली चूक दुरुस्त केल्याचे दिसले. गेल्या आठवड्यापासूनच चुकीची दुरुस्ती करण्यास काँग्रेसनेही सुरुवात केली होती. राहुल गांधी यांची चौकशी झाली तेव्हा काँग्रेसने उघडपणे ‘ईडी’विरोधात भूमिका घेतली होती. यावेळी संसदेत आणि संसदेबाहेरही महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीचा विषय समोर ठेवून काँग्रेस आणि विरोधक ‘ईडी’विरोधात आक्रमक झाले आहेत.

पैशांच्या अफरातफरी नियंत्रण कायद्यामध्ये (पीएमएलए) केलेल्या दुरुस्त्यांमुळे ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांना चौकशीचे व्यापक अधिकार मिळाले आहेत. त्यामध्ये व्यापक छापे टाकण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणांना दिलेले हे अधिकार योग्य असल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतरच ‘ईडी’ने ‘नॅशनल हेराल्ड’संदर्भातील ‘यंग इंडियन’च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला व नंतर या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. ‘यंग इंडियन’चे कार्यालय बंद केल्यानंतर, बुधवारी संध्याकाळी लगेचच सोनिया गांधी यांचे निवासस्थान ‘दहा जनपथ’ व तुघलक रोडवरील राहुल गांधी यांचे निवासस्थान आणि काँग्रेस मुख्यालयाला दिल्ली पोलिसांनी घेराव घातला होता. ‘ईडी’सह पोलिसी कारवाईतून काँग्रेसविरोधात दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. सोनिया आणि राहुल यांच्या निवासस्थानांवर ईडीचा छापा टाकण्याचा हेतू असू शकतो, अशी चर्चा होत होती. छाप्याच्या शक्यतेने काँग्रेसचे नेते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले़ काँग्रेस मुख्यालयाभोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून केंद्र सरकारतर्फे जरब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय व सोनियांचे निवासस्थान असलेल्या अकबर रोडच्या दोन्ही बाजूंवर केलेली नाकाबंदी मागे घेतली आणि हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. काँग्रेसनेते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी, ‘कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस मोर्चा काढेल’, असे आव्हान देत आता केंद्र सरकार आणि भाजपने टाकलेले ‘ईडी’चे जाळे रस्त्यावर उतरून तोडले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा… मंडलिक-महाडिक मनोमीलन, तर माने-शेट्टी यांच्यात संघर्ष, कोल्हापुरात नवीन राजकीय समीकरणे

काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे द्विस्तरीय आंदोलन सुरू झाले. संसदेपासून राष्ट्रपती भवनावर काँग्रेसच्या खासदारांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. विजय चौकात जमावबंदी लागू केल्यामुळे संसदेच्या परिसरात कुठल्याही स्वरुपाचे आंदोलन करण्यास पोलिसांनी मनाई केली. विजय चौकात पोलिसांनी पूर्ण नाकाबंदी केल्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा अडवण्यात आला. मोर्चापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींसह दोन्ही सदनांमधील काँग्रेसच्या खासदारांनी संसदभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळे कपडे घालून निदर्शने केली. काँग्रेसच्या मुख्यालयातून पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. या मोर्चाचे नेतृत्व प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे दिले होते. काँग्रेस मुख्यालयाच्या परिसरातही जमावबंदी लागू करण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांची सकाळी नऊ वाजल्यापासूनच धरपकड केली जात होती. ‘ईडी’चा नामोल्लेखही न करता महागाई, बेरोजगारी आदी जनतेच्या विषयांवर काँग्रेसने रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन केले.