Bastar Congress Candidate Kawasi Lakhma छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नव्या आशेसह लोकसभा निवडणुकीत उतरली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ११ जागा लढवल्या होत्या, परंतु केवळ दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. यंदा निकाल बदलणार असल्याची आशा काँग्रेस नेत्यांना आहे. त्यासाठी पक्ष जोरदार तयारीला लागला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा बस्तरची होती. काँग्रेसने या जागेवर सहा टर्म आमदार कवासी लखमा यांना उमेदवारी दिली आहे. छत्तीसगडमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना लोकसभा उमेदवार कवासी लखमा यांनी आगामी निवडणूक, मतदानाचे मुद्दे, आदिवासींचे हक्क अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

narendra modi
काँग्रेस ५० जागाही जिंकणे कठीण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
BJP focus on Gandhinagar
‘गांधीनगर’वर भाजपाचे लक्ष; शाह आधीचा विक्रम मोडीत काढणार? काँग्रेसचे गणित काय?
gujarat muslim candidate news
गुजरातमध्ये मुस्लीम समाजाचे ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून त्यातला एकही नाही; कारण काय?
congress candidates list
काँग्रेसकडून बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनाही उमेदवारी, कारण काय?
Akshay Kanti Bam Milind Deora Ashok Chavan leaders left Congress Lok Sabha polls
इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार भाजपात; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडणाऱ्या नेत्यांची यादी
akshay bam
सूरतपाठोपाठ इंदूरमध्ये माघारनाट्य, काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज मागे ; लोकशाहीला धोका असल्याचा पक्षाचा आरोप
SP and BSP gave chance
भाजपाच्या पराभवासाठी सपा अन् बसपाने जाटव दलित उमेदवारांना दिली संधी; आग्रा कोण जिंकणार?
Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध

बस्तर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले जावे अशी इच्छा

बस्तरमधील मुख्य मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले, बस्तर आणि रायपूरला जोडणारा रेल्वे मार्ग नाही. छत्तीसगडमधील सात जिल्ह्यांना जोडणार्‍या आणि शेजारच्या तेलंगणातील भद्राचलम आणि वारंगलशीला जोडल्या जाणार्‍या दोन रेल्वे मार्गांची या भागात आवश्यकता आहे. बस्तर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले जावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे लखमा म्हणाले. अयोध्येला जोडल्या जाईल अशा विमानतळाची दंतेवाडा येथे गरज आहे, जेणेकरून लोक मोठ्या संख्येने दंतेश्वरी मंदिराच्या दर्शनासाठी येऊ शकतील.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

दुसरा प्रमुख मुद्दा नक्षलवादाचा आहे. पोलिसांच्या हातून आणि नक्षलवाद्यांच्या हातून आदिवासी मारले जात आहेत. तरुण आदिवासींना तुरुंगात पाठवले जात आहे किंवा स्थलांतरित केले जात आहे. आम्ही सत्तेत असताना प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आले. आमच्या सरकारने ‘विश्वास, विकास आणि सुरक्षा’ या तत्त्वावर काम केले, परंतु भाजपा सत्तेवर आल्यापासून त्यांनी आदिवासींना मारणे आणि पुन्हा तुरुंगात पाठवणे सुरू केले आहे. आदिवासींना धमकावले जात आहे, असे लखमा यांनी सांगितले.

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

आदिवासी कमी शिकले असल्यामुळे त्यांना मारहाण आणि धमक्या दिल्या जात आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आम्ही सत्तेत असताना तीन आदिवासी मारल्या गेलेल्या सिल्गरची घटना सोडल्यास दुसरी घटना घडली नाही. चार महिन्यांपूर्वी भाजपाने सत्ता हाती घेतल्यापासून पोलिसांनी गोळीबार केल्याच्या १० घटना घडल्या आहेत.

कवासी लखमा यांनी भाजपावर अनेक आरोप केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आज बाजारात किंवा जत्रेला जाणाऱ्या सामान्य आदिवासींकडेही सरकार नक्षलवादी म्हणून पाहत आहेत. मी दिल्लीत हा मुद्दा उपस्थित करेन आणि बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित करेन. आदिवासींना जमिनीचा हक्क, अन्न आणि पाणी मिळणे आवश्यक आहे, असे लखमा म्हणाले. तिसरा मुद्दा गोदावरी नदीवरील पोलावरम धरणाची उंची कमी करणे आहे, असे लखमा यांनी सांगितले. छत्तीसगडमधील गावे पाण्याखाली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी हा बदल करणे आवश्यक आहे.

जल, जंगल आणि जमीन यावरील आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) अधिनियम, १९९६ मधील तरतुदींमध्ये बदल करण्याबद्दल ना भाजपा बोलत आहे ना काँग्रेस. यावर लखमा म्हणाले, आम्ही हा कायदा आणला, परंतु सत्ता मिळाल्यानंतर भाजपा आदिवासींच्या हक्कांवर गदा आणत आहे. छत्तीसगडमधील माझ्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत मी या विषयांवर बोललो आहे आणि आता मी या मुद्द्यांना दिल्लीला घेऊन जाणार आहे, असे लखमा यांनी सांगितले.

निवडणूक रोखे म्हणजे जगातील सर्वात मोठी फसवणूक

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या आहेत, त्या छोटे अंबालमध्येही मला आघाडी मिळेल, असा दावा लखमा यांनी केला. आज जगातील सर्वात मोठी फसवणूक म्हणजे निवडणूक रोखे आहे. त्यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले आहे, पण निवडणूक रोख्यासाठी कोणाला तुरुंगात पाठवणार? असा प्रश्न त्यांनी केला.

नगरनार स्टील प्लांटच्या खासगीकरणाविषयी बोलताना ते म्हणाले, मी राज्याचा उद्योगमंत्री असताना राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाला (एनएमडीसी) शक्य न झाल्यास, छत्तीसगड सरकार हा प्लांट चालवेल, असा प्रस्ताव मांडला होता. त्याचे खासगीकरण होऊ नये यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असे लखमा म्हणाले.

इंडिया आघाडीचा विजय होईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील

निवडणुकीत आपल्या विजयाच्या शक्यतेबद्दल बोलताना ते म्हणाले, मला १०१ टक्के खात्री आहे की मी जिंकेन. भाजपा (एनडीए) लोकसभेच्या ४०० जागा जिंकेल असे म्हणत आहे, पण मला खात्री आहे की ते २०० जागासुद्धा जिंकू शकणार नाहीत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी जिंकेल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मोदींच्या पाठीशी नाही, मग देश तरी त्यांना कसा साथ देईल, असे लखमा म्हणाले. २०१९ च्या निवडणुकीत सीपीआय, बसप आणि नोटा यांनी एकत्रितपणे एक लाखांहून अधिक मते मिळविली होती. काँग्रेसचे दीपक बैज बस्तरमधून ३९ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

राहुल गांधी पंतप्रधान होतील, असा दावा कवासी लखमा यांनी केला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तुम्हाला एक लाख मते मिळतील का? यावर लखमा म्हणाले, यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एकत्र आहेत. बसप किंवा सीपीआय यापैकी कोणीही जिंकणार नाही, हे माहीत आहे. मी भाजपाचा एकमेव प्रतिस्पर्धी आहे. लोकांना माहीत आहे की, मी सहा वेळा आमदार राहिलो आहे आणि माजी मंत्री आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी दिल्लीत आवाज उठवू शकतो. कार आणि स्पीकर वापरून मते मिळवता येतील असे भाजपाला वाटते, पण मी लोकांच्या मनात घर करत आहे. त्यामुळेच लोक मला नेता म्हणत नाहीत, मी ‘दादी (भाऊ)’ म्हणून लोकप्रिय आहे.

हेही वाचा : ‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?

भाजपाच्या उमेदवाराबद्दल बोलताना ते म्हणाले, भाजपाचे उमेदवार (महेश कश्यप) कोणाला माहीत आहेत? भाजपाला मोदींमुळेच मते मिळतात आणि यावेळी मोदी लाट नाही. मोदींकडे पाहा, ते किती उदास दिसतात. त्यांनी प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण १५ पैसेही दिले नाहीत.