बुलढाणा : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची प्रथम यादी जाहीर झाली तेव्हा त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यातील विश्वासू आमदार संजय कुटे यांचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर या पदावर चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली. त्यामुळे कुटे यांचे काय? असा प्रश्न भाजप वर्तुळात विचारला जात आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात कुटे यांना संधी मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. मात्र जिल्ह्यातील शिंदे समर्थक आमदारही मंत्रीपदासाठी उत्सुक असल्याने नेमकी संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा… Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे तीन व शिंदे गटाचे दोन अशा ५ पैकी एकाही आमदाराला संधी मिळाली नाही. माजी मंत्री संजय कुटे हे फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने त्यांचा समावेश नक्की मानला जात होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यांच्या नावाचा विचार प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरू असल्याने त्यांना मंत्री केले नाही, अशी चर्चा भाजप वर्तुळात होती. मात्र आता या पदावर चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली. त्यामुळे कुटे गटात अस्वस्थता आहे. ते मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री होतील, असे सांगितले जात आहे. पण शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू रायमूलकरही इच्छूक आहेत. यात खा. प्रतापराव जाधव यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खा. जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा आहे. तसे झाले तर शिंदे गट मंत्रीपदाचा दावा सोडेल व कुटे यांचा मंत्री होण्याचा मार्ग सुकर होईल. पण सध्या केंद्रात व राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.