चंद्रशेखर बोबडे

नागपूर : जनलोकपाल आंदोलनानंतर नावारूपास आलेल्या आम आदमी पार्टीचा विदर्भातील उच्चशिक्षित चेहरा म्हणून डॉ. देवेंद्र वानखडे यांची ओळख आहे. समाजकारणाची आवड असणारे डॉ. वानखडे अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात सहभागी झाले व त्यातून त्यांचा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला. संघटनात्मक बांधणीचे कौशल्य ही त्यांची जमेची बाजू आहे.

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

हेही वाचा >>>अभिमन्यू पवार, आमदार, औसा विधानसभा मतदारसंघ ,स्वयंसेवक ते आमदार

प्रस्तापित राजकीय पक्षाचे केंद्रबिंदू असलेल्या नागपुरात शहरी तोंडवळा असलेल्या आम आदमी पार्टीला जनमानसापर्यंत पोहचवण्याचे कठीण काम वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आज हा पक्ष नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व प्रभागात निवडणुका लढवण्याची तयारी करतो आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळीही आहे.

डॉ. देवेंद्र वानखडे उच्चशिक्षित आहेत. नागपूर येथे १९९८ पासून प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. समाजकारणाची आवड असल्याने सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा, त्यांना सुगीचे दिवस यावे असे वाटत असल्याने ते विविध संघटनांशी जुळले व त्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू लागले. २०११ मध्ये दिल्लीत जनलोकपाल आंदोलन सुरू झाले, याबाबत नागपुरात एक बैठक होणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर ते मित्रासह त्या बैठकीला गेले. जनलोकपाल आंदोलनातील सहकारी मयंक गांधी यांनी बैठकीत आंदोलनाचे स्वरूप सांगून यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्या दिवसापासून डॉ. वानखडे या आंदोलनाशी जुळले.

हेही वाचा >>>केतन नाईक : कामगार चळवळीतील नेतृत्व

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचेही आकर्षण होतेच. केजरीवालांनी पार्टी काढण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यासोबत म्हणजेच त्यांच्या आम आदमी पक्षासोबत जाण्याचा निर्णय वानखडे यांनी घेतला. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व त्यांनी घेतले व त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्य हेरून केजरीवाल यांनी त्यांना राष्ट्रीय परिषदेचा सदस्य केले. त्यानंतर नागपूर जिल्हा संयोजकपदावर नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये पक्षाने नागपूर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना पडलेली ६९ हजार मते नागपुरात आम आदमी पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यास कारणीभूत ठरली. त्यानंतर पक्षाने संघटनात्मक पातळीवर लक्ष केंद्रित करून वानखडे यांच्यावर विदर्भ संयोजक आणि राज्य समिती सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत वानखडे पक्षबांधणीचे काम करीत आहेत. मागील एका दशकात पक्षात बरेच चढउतार आलेत, परंतु काम निरंतर चालू ठेवले. आज नागपुरात प्रत्येक प्रभागात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नागपूरकर तिसरा पर्याय म्हणून या पक्षाकडे पाहात आहे. हे सर्व यश सामूहिक प्रयत्नाचे यश असल्याचा दावा वानखडे करतात.