संतोष प्रधान

महाविकास आघाडीत जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने २२ जागा लढविण्याचे जाहीर करून १७ जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली. तसेच मुंबईत चार जागांवर उमेदवार जाहीर करून उत्तर मुंबईचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक चालीमुळे काँग्रेसला आणखी गळती लागण्याची चिन्हे आहेत.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित

शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. वास्तविक सांगलीत शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे. तरीही शिवसेनेने दबावाचे राजकारण करून काँग्रेसवर मात केली. सांगलीत शिवसेनेचा निभाव लागणे कठीण असल्याचे काँग्रेसचे नेते आता उघडपणे बोलू लागले आहेत.

आणखी वाचा-“गरीब व श्रीमंतांमध्येही काँग्रेस दुरावत असल्याची भावना”, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे खडे बोल

मुंबईतील सहापैकी चारा जागांवर शिवसेनेने उमेदवारी जाहीर केले. उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे दोनच मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी आहे. यापैकी उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघातून कोणीही लढण्यास फारसे उत्सूक नाही. मुंबईत मराठी आणि मुस्लीम या मतांच्या आधारे यश मिळवू शकतो, असा ठाकरे गटाला विश्वास वाटतो. मुस्लीम मतांवर शिवसेना ठाकरे गटाची भिस्त असली तरी ही मते किती प्रमाणात मिळतील यावरही सारे गणित अवलंबून आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत मुस्लीम मतदान तेवढे होत नाही, असाही अनुभव आहे. मुंबईत काँग्रेसची साथ किती मिळते हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वांना बरोबर घ्यावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पण शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे आघाडीत सख्य राखण्याचे मोठे आव्हान असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांची मते परस्परांकडे हस्तांतरित होतात. पण शिवसेना ठाकरे गटाची मते समोर शिंदे गटाचा उमेदवार असल्यास त्याकडे वळू शकतात. यामुळेच महाविकास आघाडीत मतांचे हस्तांतरण हे मोठे आव्हान आहे.

आणखी वाचा-पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी असल्याने सांगलीची जागा लढवित असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पण सांगलीत शिवसेनेची ताकद किती, असा प्रश्न काँग्रेसचे नेते करीत आहेत. सांगलीत भाजपचा विजय अधिक सोपा झाल्याचीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना २० व काँग्रेसला १८ किंवा १९ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती. पण शिवसेनेने परस्पर २२ जागा लढविण्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ १७ जागा येणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला ९ जागा येणार आहेत.