दयानंद लिपारे

कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा संघर्ष वरकरणी सत्तारूढ आणि विरोधक अशा पातळीवर आहे. तथापि, त्याच्या पडद्याआड आजी-माजी आमदार, नरके घराण्याची यादवी या खऱ्या राजकारणाची जोड असल्याने कारखान्यावर झेंडा कोणाचा लागणार याला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >>>मोदींकडून शरद पवारांचे नेहमीच कौतुक तरीही केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर राष्ट्रवादीचेच नेते

कोल्हापूर जवळच असलेल्या कुंभी कासारी या दोन नद्यांच्या नावांनी या कारखान्याची स्थापना कै. डी. सी. नरके यांनी १९५३ साली केली. नरके यांची तिसरी पिढी सत्तेसाठी संघर्ष करीत आहे. शिवसेनेचे दोन वेळचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग दोनदा कारखान्यावर सत्ता राखली आहे.

आरोप – प्रत्यारोपाची राळ

चंद्रदीप नरके यांना आव्हान देणारे विरोधकांच्या शाहू विकास आघाडीचे प्रमुख, गोकुळचे संचालक बाजीराव खाडे हे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक आहेत. पाटील – नरके यांच्यातील दोन दशकाचा राजकीय संघर्ष आहे. नरके यांना राजकीय पातळीवर रोखायचे असते तर त्यांचे अर्थ केंद्र असलेल्या कारखान्यातून सत्ताच्युत करणे हे पाटील यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. स्वतः पाटील या कारखान्याच्या प्रचारात नसले तरी त्यांची ताकद शाहू आघाडीच्या मागे आहे. शाहू आघाडीने चंद्रदीप नरके यांच्यामुळे कारखान्यावर ३०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा असल्याचा मुद्दा उपस्थित करून कोंडी केली आहे. नरके यांनी पी. एन. पाटील नेतृत्व करत असलेल्या भोगावती साखर कारखान्याची थकीत बिलांचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांसह पाटील यांच्यावर पलटवार करतानाच विरोधकांचे आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

हेही वाचा >>>Rajasthan budget 2023: मुख्यमंत्री १० मिनिटं जुनाच अर्थसंकल्प वाचत राहिले, विरोधी पक्षांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब

यादवी उफाळली

नरके – पाटील यांच्यातील पूर्वापार संघर्ष सुरू असताना आणखी एक उल्लेखनीय पदर या निवडणुकीत दिसत आहे; तो म्हणजे नरके घराण्यातील यादवी. संस्थापक नरके यांचे दोन्ही नातू एकमेकांना आव्हान देत आहेत. थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार, गोकुळचे संचालक डॉ. चेतन यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांचे पिता अरुण नरके यांचे प्रयत्न आहेत. कुंभीची निवडणूक भरात असताना नरके पितापुत्रांनी पी. एन. पाटील यांची भेट घेऊन राजकीय पाठबळ मागितले आहे. त्यातून उसाच्या राजकारणाने नरके घराण्यातील यादवी पुढे येवून कटुता निर्माण झाली आहे. चेतन यांनी चंद्रदीप यांच्या कारखान्याच्या कारखान्यातील आर्थिक कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला अभियांत्रिकी अभियंता असलेले चुलत बंधू चंद्रदीप यांनीही ठोस प्रत्युत्तर दिले असल्याने नरके बंधूतील राजकीय सामना रंगात आला आहे.

सतेज पाटील कोणाचे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभीच्या कार्यक्षेत्रामध्ये गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा प्रभाव निर्णायक आहे. विरोधकांकडे असलेल्या गोकुळच्या काही संचालकांनी सतेज पाटील आमच्या सोबत असल्याचे सांगत आहेत. नरके गटानेही त्यांचा आम्हालाच पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा काँग्रेस आणि आगामी निवडणुका यावर नजर ठेवून सतेज पाटील तटस्थ राहिल्याने संभ्रम वाढीस लागला आहे.