दयानंद लिपारे

कोल्हापूर : अंमलबजावणी संचालनालयाटी (ईडी) चौकशी आणि भाजपच्या दबावाचे राजकारण सुरू असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आर्थिक आलेख उंचावण्यात आणि विश्वास संपादन करण्यात अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना यश आले असल्याचे मार्च अखेरची आकडेवारी दर्शवत आहे. बँकेच्या आर्थिक स्थिती सदृढ झाल्याने जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखान्यांना अधिक कर्ज पुरवठा होणार असल्याने त्यांचे चेहरे खुले आहेत. बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब सर्वपक्षीय सत्ताधारी संचालकांच्या पथ्यावर पडणारी आहे.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये चौकशीचा ससेमिरा लागला आहे. प्राप्तिकर विभाग, ईडी यांच्याकडून सतत छापसत्र सुरू आहे. कागल, पुणे, मुंबई येथील निवासस्थान, त्यांचा संताजी घोरपडे हा खाजगी साखर कारखाना, त्यांनी चालवायला घेतलेला ब्रिस्क – गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना तसेच ते अध्यक्ष असलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे ईडीची सातत्याने छापेमारी सुरू आहे. खेरीज भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार कोल्हापूरला येऊन मुश्रीफ यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरत आहेत. तर, स्थानिक पातळीवर मुश्रीफ यांचे राजकीय स्पर्धेक भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही जिल्हा बँक, घोरपडे साखर कारखाना याबाबत मुश्रीफ यांना अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. घाटगे यांच्या समर्थकांनी मुश्रीफ यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी पोलिसात दिल्या आहेत. या चौकशीच्या घेऱ्यामुळे आणि भाजपच्या राजकीय दाबावाच्या राजकारणामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला होता.

बँकेमध्ये ईडीने दोनदा छापेमारी केली. एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नेऊन चौकशी केली. तीन संचालकांना चौकशीसाठी बोलावले गेले. आमदार मुश्रीफ यांनाही वारंवार जिल्हा बँकेत प्रकरणी ईडी कार्यालयात उपस्थित राहावे लागत आहे. जिल्हा बँकेने अर्थ पुरवठा केलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पाटील यांनाही ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याची वेळ आली. त्यामुळे या ना त्या कारणाने जिल्हा बँकेचे अर्थकारण, राजकारण हे चर्चेत आले आहे.

आर्थिक आलेख उंचावला

कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये सर्वपक्षीय सत्ता आहे. मात्र त्याचे नेतृत्व हे पूर्णतः मुश्रीफ यांच्या हाती एकवटलेले आहेत. तथापि मुश्रीफ यांच्या कारभाराला ईडी अन्य कारणांनी चौकशी सुरू असताना अन्य संचालकांनी आव्हान दिल्याचे ऐकिवात नाही. उलट, चौकशी सुरू असताना बँकेचा कारभार एकवाक्यतेने, सर्वसमावेशकतेने होत असल्याचा निर्वाळा दिला गेला. बँकेचा कर्ज पुरवठा होत असलेल्या सर्वपक्षीय साखर कारखानदारांनी बँकेच्या अर्थव्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले होते. या पातळीवर बँकेचे कामकाज आणि मुश्रीफ यांचे नेतृत्व सक्षम असले तरी आर्थिक पातळीवर बँकेची कामगिरी कशी होते याला अधिक महत्त्व आले होते. चौकशीचा ससेमिऱ्यामुळे वित्तीय संस्थेवर परिणाम होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याला जिल्हा बँक अपवाद ठरली असल्याची आर्थिक वर्ष सांगतेची आर्थिक परिस्थिती दर्शवत आहे. बँकेच्या ठेवी ७४७० कोटी वरून ८२८१ कोटी झाल्या आहेत. कर्ज वाटप ५२३२ कोटी वरून ६२४५ कोटी झाले असून त्यामध्ये १०१३ कोटी रुपये वाढ झाली आहे. भाग भांडवलात २० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा ढोबळ नफा २२.७३ कोटी रुपये वाढला आहे. बँकेच्या सर्व १९१ शाखा नफ्यात असून एकही शाखा एनपीएमध्ये नाही. ही आकडेवारी मुश्रीफ पत्रकार परिषदेत मांडत असताना काँग्रेसचे आमदार, उपाध्यक्ष राजू आवळे, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने यांची उपस्थिती राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय ठरली.

साखर कारखान्यांना अर्थदिलासा

कोल्हापूर जिल्हा बँकेची याआर्थिक प्रगती आणि नफ्यामध्ये झालेली वाढ याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. सुमारे ५५० कोटी रुपये साखर कारखान्यांना उपलब्ध होणार आहे. स्वाभाविकच प्रत्येक कारखान्याला ४५ कोटी रुपये अधिक मिळणार असल्याने सर्वपक्षीय कारखानदारांना हा अर्थदिलासा ठरला आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये जानेवारी महिन्यात ईडीची छापेमारी झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याचा कसलाही परिणाम बँकेच्या अर्थकारणावर झालेला नाही. उलट ठेवीदारांनी विश्वास दाखवलेला आहे. कर्जदार,ग्राहक यांचे सहकार्य मिळाले आहे. अडचणीच्या काळातही बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. – हसन मुश्रीफ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.