scorecardresearch

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश

गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला ठसा उमटिवणारे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात गुरुवारी प्रवेश केला.

chdrashekar rao harshvardhan jadhav
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश

सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर: गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला ठसा उमटिवणारे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात गुरुवारी प्रवेश केला. या राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुरू असणाऱ्या योजना त्यासाठी करण्यात आलेली तरतूद पाहून हे विकास प्रारुप महाराष्ट्रासाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश सोहळ्यांनतर ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>>Tamil Nadu: “स्टॅलिन, मलाही अटक करा”; डीएमके सरकारविरोधात ट्विटरवर ट्रेंड

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये टॅक्ट्रर चिन्हावर दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळविणारे हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीच्या रिंगणातील सोंगट्यांची ताकद आपल्या बाजूने वळविली होती. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोठे मोर्चे आणि त्यानंतरच्या वातावरणात मताचे नवे ध्रुवीकरण करण्यास त्यांना यश आले होते. या निवडणुकीनंतर घरगुती वाद जाहीरपणे चर्चेत असणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर नानाप्रकारचे आरोप केले होते. विविध राजकीय भूमिका व्यक्त करणारे जाधव यांनी आता चंद्रशेखर राव यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वी मराठवाड्यातून शंकरअण्णा धोंडगे यांनीही बीएचआर या पक्षात प्रवेश केला होता. येत्या रविवारी चंद्रशेखर राव यांनी लोहा येथे सभा आयोजित केली असून या सभेतही काही कार्यकर्ते प्रवेश करतील, असे आता सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हटाव मोहिम सुरू

‘ मराठा’ समाजाचे ध्रुवीकरण व्हावे अशी रचना करण्यात यश मिळविणारे हर्षवर्धन जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये व त्यानंतर शिवसेनेमध्येही काम केले होते. लोकसभा निवडणूक मात्र त्यांनी अपक्ष लढवून लक्षणीय मते मिळविल्याने शिवसेनेचे उमेवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व छत्रपतीसंभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील २०१९ मध्ये निवडून आले. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचे बीएचआर या पक्षातील पक्ष प्रवेश राजकीय व्यक्तींना भुवया उंचवायला लावणारा आहे.

या पक्षातील पक्षप्रवेशाबाबतीच भूमिका विषद करताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, ‘ तेलंगणा राज्याने विपरित परिस्थितीमध्ये शेतीप्रश्नावर मोठे काम उभे केले आहे. खरे तर हा प्रदेश आवर्षण प्रवण आहे. तरीही पाण्याच्या योजनांसाठी काम सुरू आहे. महाराष्ट्रात पाच पट चांगल्या सुविधा असताना काम काही होत नाही. त्यामुळे या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पक्षात प्रवेश दिला. येत्या २६ ऑगस्टच्या लोहा येथील सभेला उपस्थित राहणार असून शेतकरी व शेतीप्रश्नावर राज्य सरकारच्या धोरणावर बोलू.’

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या