गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांसह विक्रमी विजय मिळवला आहे. दरम्यान, क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रिवाबा जाडेजा यांचा ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. त्यांना ५७ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. आम आदमी पक्षाचे करशनभाई करमूर २३ टक्के मतांसह दुसऱ्या, तर काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जाडेजा १५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा – Gujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं?

काँग्रेसचे दिग्गज नेते हरीसिंह सोलंकी यांचे नातेवाईक असलेल्या रिवाबा जाडेजा यांनी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यंदा त्यांना जामनगरमधून भाजपाकडून उमेवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत रविंद्र जाडेजाची बहीण आणि काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नैनाबा जाडेजा काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचार केला होता.

हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये लोकप्रिय घोषणांनी काँग्रेसला तारले; प्रियंका गांधींच्या प्रचाराला पहिल्यांदाच यश

यासंदर्भात बोलताना, “जामनगरमधील निवडणूक ‘जाडेजा विरुद्ध जाडेजा’ नव्हती. कारण, वैचारिक मतदभेद असणारी जामनगरमध्ये अनेक कुटुंबे आहेत”, अशी प्रतिक्रिया नैनाबा यांनी दिली. “माझ्या भावावर माझे प्रेम कायम आहे. माझ्या वहिनी भाजपाची उमेदवारी असली तरी वहिनी म्हणून त्यांचा स्वभाव चांगला आहे. आमच्या कुटुंबात आम्हाला स्वातंत्र्य आहे. त्यांना जे काही करायचं ते करु शकतात,” असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – मैनपुरीमध्ये सपाचा बोलबाला! अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव २ लाख ८८ हजार मतांच्या फरकाने विजयी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करत १८४ पैकी १५७ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये पहिल्यांदाच निवडणुका लढवत असलेल्या आम आदमी पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला आहे.